पदोन्नतीमधील आरक्षणासाठी रिपब्लिकन पक्षाचे निदर्शने आंदोलन

Republican protests - Maharashtra Today

मुंबई दि. 7 – पदोन्नतीमधील आरक्षण हा मागासवर्गीयांचा संविधानात्मक अधिकार आहे.त्यामुळे राज्य सरकार ने त्वरित पदोन्नतीमधील आरक्षणाचा निर्णय घ्यावा या मागणीसाठी आज रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अंधेरी तहसील कार्यलयावर तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात आले. केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांच्या आदेशानुसार झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व रिपाइं चे मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे ; जिल्हा अध्यक्ष प्रकाश कमलाकर जाधव यांनी केले. यावेळी जयंतीभाई गडा; रतन अस्वारे; बाबुराव बनसोडे; किसन रोकडे; सो ना कांबळे; अंकुश हिवाळे; सोमा देवेंद्र शेखर सुब्रमण्यम; श्रीमंत तोरणे; फुलचंद कांबळे; रमेश पाईकराव; दीपक बाबर ; सुनील पवार आदी पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button