कंगनाला रिपब्लिकन पार्टी देणार संरक्षण – रामदास आठवले

ramdas athavale

दिल्ली : टीका केली म्हणून कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना यांनां भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पार्टी कंगनाला संरक्षण देईल, अशी घोषणा पक्षचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांनी केली.

मुंबईत ९ सप्टेंबरला येते आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर रोखा, असे आव्हान अभिनेत्री कंगना राणौत हिने दिले आहे. यानंतर, कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणालेत. या वादात उडी घेत आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी घोषणा केली – रिपब्लिकन पार्टी कंगनाला संरक्षण देईल.

राऊतांनी धमकी दिली – आरोप

संजय राऊत यांनी मला धमकी दिली – ‘मुंबई पोलिसांची भीती वाटत असल्यास पुन्हा शहरात येऊ नकोस. आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?,’ असे ट्विट कंगनाने केले होते.

आजचा वाद

“मला अनेक जण मुंबईला परत न येण्याची धमकी देत आहेत, म्हणून मी ठरवले आहे की, येत्या आठवड्यात ९ सप्टेंबरला मुंबईला जाईन. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार, याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा”, असे कंगना म्हणाली. भाजपा नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्विटला रिट्विट करत कंगनाने म्हटले – “कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?” असा सवाल परवेश साहिब सिंह यांनी केला होता.

संजय राऊत

“मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अ‍ॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही. या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी, अशी टीका संजय राऊत यांनी कंगना राणौतवर केली. धमकी वगैरे देण्याची मला सवय नाही, आम्ही ‘अ‍ॅक्शन’ घेतो, महाराष्ट्रात कमवते, खाते, मुंबई पोलीस त्यांचे रक्षण करते. त्यांच्यावरच आरोप कोणी करत असेल तर आम्ही त्यावर आक्षेप घेऊ शकत नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे.

रामदास आठवले

लोकशाहीत प्रत्येकाला टीका टिप्पणी करण्याचा अधिकार आहे. मत मंडण्याचे स्वातंत्र्य आहे. कंगना राणौतने मुंबईवर टीका केली नसून राज्यसरकार वर टीका केली आहे. टीका केली म्हणून तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे लोकशाही विरोधी आहे. कंगना यांनां भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार मुंबईत राहण्याचा अधिकार आहे. तिला कोणी विरोध करण्याचा प्रयत्न केला तर रिपब्लिकन पक्ष कंगन ला संरक्षण देईल असे मत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले.

शिवसेना सरकार मध्ये सहभागी आहे. त्यामुळे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगनाला धमकी देणे योग्य नाही. कंगना यांनी सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात मांडलेली मते असो की सुरक्षा यंत्रणा वरून राज्य सरकार वर केलेली टीका असो याप्रकरणी कंगनावर तिला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही अशी भूमिका घेणे योग्य नाही. कंगनाने मुंबईत पाऊल ठेवण्यास कोणी विरोध करणार असेल तर रिपब्लिकन पक्ष कंगना राणावतचे संरक्षण करील असा इशारा रामदास आठवले यांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER