रिपब्लिकन चळवळीचे मारेकरी नेमके कोण?

काही वर्षांपूर्वी गमतीने असे म्हणत असत की रिपब्लिकन पक्षाचे ए पासून झेडपर्यंत  गट आहेत. रा सू.गवई,प्रा. जोगेंद्र कवाडे,रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर, गंगाधर गाडे,टी. एम. कांबळे अशा नेते मंडळींनी विविध गटांमध्ये रिपब्लिकन पक्ष चालवला. नामदेव ढसाळ यांच्या दलित पॅंथरने देखील एक काळ गाजवला अलीकडे इंदू मिलमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याच्या मागणीसाठी आंदोलन केल्याने प्रसिद्धीच्या झोतात आलेले आनंदराज आंबेडकर रिपब्लिकन सेना चालवतात ते प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आहेत.

ही बातमी पण वाचा : वंचित बहुजन आघाडीला मुस्लिमांची साथ ; काँग्रेसला धक्का बसणार?

याशिवाय शेवटचे आचके देणारा खोब्रागडे रिपब्लिकन पक्ष आहेच. दादासाहेब गायकवाड,बॅ.राजाभाऊ खोब्रागडे, बाबू आवळे बी.सी. कांबळे या मान्यवर रिपब्लिकन नेत्यांनी एकेकाळी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील रिपब्लिकन पक्ष चालवण्याचा नेटाने प्रयत्न केला. पुढे त्यांनादेखील टीकेचे धनी व्हावे लागले. गटातटात विभागल्या गेलेल्या रिपब्लिकन पक्षाला कायमच दुहीचा शाप बसला. या शापातून तो कधीच मुक्त होऊ शकला नाही. नेत्यांची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पक्षापेक्षा मोठी झाली आणि पक्षाची एकेक शकले पडायला सुरुवात झाली.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकरांच्या विजयासाठी ‘माकप’ने आवळली वज्रमूठ

माझा रिपब्लिकन पक्ष खरा आणि मीच खरा नेता या उद्दाम भावनेने एकूणच रिपब्लिकन चळवळीची वाट लागली. 1998 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्व  चारही बड्या नेत्यांचे मनोमिलन झाले. त्यात प्रकाश आंबेडकर, सू. गवई, रामदास आठवले आणि जोगेंद्र कवाडे यांचा समावेश होता. रिपब्लिकन ऐक्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण बदलले. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत हे चारही नेते काँग्रेसच्या सहकार्याने निवडून आले. काँग्रेस-रिपब्लिकन युतीने चमत्कार घडवला. विदर्भातील सर्व 11 जागा जिंकल्या. त्यावेळचे रिपब्लिकन ऐक्य हे क्षणभंगुर ठरले.पुन्हा चार नेत्यांची तोंडे चार दिशेला गेली. कार्यकर्त्यांची वाताहत झाली. विदेशीच्या मुद्यावरून सोनिया गांधी यांना विरोध करीत शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली त्यावेळी रा सु गवई आणि आणि रामदास आठवले हे काँग्रेस सोबत होते पण पवार वेगळेपण झाल्यानंतर आठवले त्यांच्यासोबत गेले आणि गवळी काँग्रेससोबत राहिले काँग्रेसच्या फुटीचा परीणाम  रिपब्लिकन पक्षावर झाला. तेव्हापासून गेल्या वीस वर्षात रिपब्लिकन गटांनी एकत्र यावे याकरता बरेच प्रयत्न झाले. प्रत्येक वेळी नेत्यांची महत्त्वाकांक्षा आड आली. रिपब्लिकन चळवळीसाठी तारक असलेले नेते नंतर चळवळीसाठी मारक ठरत गेले. या चळवळीचे मारेकरी  हेच नेते होते की त्यामागे आणखी कोणी होते याचाही बारकाईने विचार केला पाहिजे.

ही बातमी पण वाचा : प्रकाश आंबेडकर सोलापूर आणि अकोला या दोन्ही ठिकाणाहून लढणार!

काँग्रेसचे नेते असोत की शरद पवार असोत प्रत्येकाने रिपब्लिकन पक्षाच्या वेगवेगळ्या गटांना हाताशी धरून त्यांचा वापर करून घेतला. पदांच्या हव्यासापोटी रिपब्लिकन नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेले. आठवले यांनी राष्ट्रवादीची साथ सोडल्यानंतर ते भाजपासोबत गेले.आयुष्यभर ज्या शक्तींना मनुवादी म्हणून त्यांनी हिणवले त्यांच्या मांडीवर जाऊन बसले. केंद्रात मंत्रीदेखील झाले. जोगेंद्र कवाडे यांनी विधान परिषदेच्या आमदारकीवर समाधान मानले.आता ते आपल्या मुलाला ,(जयदीप) प्रोजेक्ट करीत असतात. दलित मते आपल्याकडे वळवण्यासाठी काँग्रेसला दरवेळी एक निळा झेंडा लागतो. तो झेंडा मिळावा म्हणून राजकीय व्यवहार ठरतात. स्वतःची अस्मिता कायम न ठेवता महाराष्ट्रातील बहुतेक दलित नेते वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या वळचणीला लागले हे वास्तव मान्यच करावे लागेल. लेटरहेडवर पाठिंबा देण्यासाठी अर्थपूर्ण व्यवहार कोणी कोणी केले याची खरी माहिती समोर आली तर अनेकांचे मुखवटे गळून पडतील.

प्रकाश आंबेडकर यांनी भारिप-बहुजन महासंघाची वेगळी चूल मांडली आणि दलितांबरोबर इतर जाती-धर्माच्या लोकांना ही जोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना मर्यादित यश मिळाले आता आपल्या पक्षाच्या नावात रिपब्लिकन हा शब्द असल्यामुळे इतर समाज त्याला स्वीकारत नाहीत याची उपरती झाल्याने त्यांनी स्वतःचा पक्ष वंचित आघाडी या त्यांच्या नवीन पक्षांमध्ये विलीन करण्याचे जाहीर केले आहे. मराठा आरक्षणाला पाठिंबा, ब्राह्मण आरक्षणाचे समर्थन अशी भूमिका घेऊन आठवले यांनीही दलितांच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला पण त्यांना आज ना दलितांमध्ये तेवढी मान्यता आहे ना इतर जातींमध्ये. दलित नेत्यांनी आपलावापर केला हे रिपब्लिकन जनतेला पुरते कळते.त्यामुळे या नेत्यांबद्दल त्यांचा कमालीचा भ्रमनिरास झाला. बहुजन समाज पार्टीने मात्र सुरुवातीपासून “एकला चलो रे” ची भूमिका घेतली. महाराष्ट्रात काँग्रेस व भाजपाच्या सावलीखाली बसपा कधीही गेली नाही. त्यामुळेच दलित मतदारांमध्ये बसपाची विश्वासार्हता आजही टिकून आहे . भाजपाला हरवायचे तर बसपा हा समर्थ पर्याय ठरू शकत नाही.  अशावेळी काँग्रेसशिवाय पर्याय नाही हे दलित मतदारांना कळते. दलितांच्या या मजबुरीचा फायदा काँग्रेसला होत आला आहे.

शेखर गजभिये
8788325322

Share

Recent Posts

जळगावातील महिला वसतिगृहातील प्रकाराची कसून चौकशी करा, रक्षा खडसे आक्रमक

जळगाव : जळगावातील शासकीय वसतिगृहात पोलिसांनी तरुणी, महिलांना निर्वस्त्र करून नाचण्यास भाग पाडल्याचा मनाला लाजवणारा…

March 3, 2021

महत्त्वाच्या खात्यांचा कारभार चालवतात निलांबरी, केडिया, आशर

मुंबई :- राज्य सरकारचा कारभार सत्ताबाह्य केंद्रे चालवितात अशी चर्चा नेहमीच होत आली आहे. मंत्रालयापेक्षा…

March 3, 2021

आज ‘कॉमेडी सम्राट’ बघायला मिळाला, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर नितेश राणेंची टीका

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेत आपल्या भाषणात…

March 3, 2021

उन्हाळी लागणे / मूत्रदाह – आहार विहार नियोजन महत्त्वाचे !

वातावरणातील उष्मा वाढण्यास सुरवात झाली की काही आजार नेमके डोके वर काढतात. घोमोळे, कांजण्या, नाक…

March 3, 2021

दैनिकाच्या सरकारी जाहिराती रोखण्याच्या आदेशास स्थगिती

प्रेस कौन्सिलने केलेल्या कारवाईचे प्रकरण नवी दिल्ली :  ‘निर्भत्सना’ निर्देश (Censure Order) देऊन `हिंदुस्तान` या…

March 3, 2021

‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वरून तेलगू चित्रपट काढून टाकण्याचा आदेश

साक्षी मलिकच्या बदनामी दाव्यात हायकोर्टाचा निकाल मुंबई : ‘व्यंकटेश्वरा क्रिएशन्स प्रा. लि.’ या निर्माता कंपनीने…

March 3, 2021

This website uses cookies.