आरे तील आदिवासींचे हक्क वाचविण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार – सुमित वजाळे

Ramdas Athawale-Sumit Vajale

संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून राज्यशासनाने आरेमधील आदिवासी कुटुंबांचे घर आणि शेतीचे अधिकार हिसकावू नयेत यासाठी केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले आरेतील आदिवासींच्या पाठीशी

मुंबई :- आरेच्या जंगलाबाबत राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. आरेतील ६०० एकर जमीन आता वनासाठी राखीव ठेवत संरक्षित वनक्षेत्र जाहिर केले आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या ट्विटर हँडलवरून या निर्णयाबाबत माहिती दिली आहे.अरे ला संरक्षित वनक्षेत्र जाहीर करून त्यातील आदिवासी कुटुंबांचे शेती आणि निवासाचे पिढीजात अधिकार राज्यशासनाने हिसकावून घेऊ नयेत यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या झोपडपट्टी महासंघाने अभ्यास दौरा करुन राज्य शासनाला निवेदन द्यावे त्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना भेटणार असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे झोपडपट्टी महासंघाचे मुंबई अध्यक्ष सुमित वजाळे यांनी दिली आहे.

या पाश्वभूमीवर आरेमधील श्रमिक मुक्ती संघटनेने आयोजित कालच्या बैठकीत मा.केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले यांच्या आदेशावरून आरेमधील आदिवासी पाड्यांची पाहणी करण्यासाठी व सध्य स्थिती जाणून घेण्यासाठी अभ्यासगट तयार करण्यात आला आहे.

आरे मधील ज्या जमिनीवर आदिवाशींची घरे आहेत,जी जमीन ते शेतीसाठी कसत आहेत ती जमीन गावठाण म्हणून घोषित करावी.

आरे मधील ६०० एकर जमीन वन घोषीत करण्याबाबत घेतलेला निर्णय हा आदीवासी बांधवांच्या हिताचा नाही. हा निर्णय घेण्याआधी शासनाने आदिवाशींचा विचार करणे आवश्यक आहे.

आरे मधील आदिवासी कुटुंबाना बेघर होऊ देणार नाही. अशी भूमिका रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे अध्यक्ष सुमित वजाळे यांनी काल झालेल्या खांबाचा पाडा आदिवासी गावठाण येथील बैठकीत मांडला.

केंद्रीय राज्यमंत्री मा.रामदासजी आठवले (Ramdas Athawale) अभ्यासगटाचा अहवाल पाहून या विषयी मुख्यमंत्री यांच्याशी भेटून बैठक घेतील.

खांबाचा पाडा येथे झालेल्या बैठकीत सुमितभाऊ वजाळे, अध्यक्ष रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघ, मा.ऍड.क्रांती एल.सी.,इंडिया सेन्टर फॉर हुमन राईट, मा.नलिनीताई भुजड, मुंबई अध्यक्षा श्रमजिवी संघटना, मा.अशोकराव खांडवे, २७ पाडे प्रमुख, मा.रवींद्र दोडीये अध्यक्ष ऑल इंडिया आदिवासी संघटना, मा.कृष्णा पांगे, अध्यक्ष खांबाचा पाडा, मा.अंकुश भोईर अध्यक्ष श्रमिक मुक्ती संघ, मा.राजू वळवी खांबाचा पाडा प्रमुख, व रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाचे सरचिटणीस रतन स.अस्वारे, भीमराव कांबळे, संतोष थोरात, गुलाब गुप्ता, गौतम मोरे, विनोद सोनावणे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER