रिपब्लिक टीव्हीचे सल्लागार संपादक प्रदीप भंडारी यांची पोलीस चौकशी

pradeep bhandari

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे सल्लागार संपादक प्रदीप भंडारी (Pradeep Bhandari) यांची शनिवारी पोलिसांनी पाच तास चौकशी केली. त्यांना गेल्या आठवड्यात समन्स बजावण्यात आले होते.

अभिनेत्री कंगना रणावत हिच्या बंगल्यात अतिक्रमण तोडण्याचे काम सुरू होते त्यावेळी बंगल्यासमोर गर्दी जमवून पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्रदीप भंडारी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असा आरोप रिपब्लिक टीव्हीने केला आहे पण पोलिसांनी हा आरोप नाकारला. भंडारी यांनी असाही आरोप केला होता की, पोलिसांनी माझा फोन जप्त केला आणि पोलीस ठाण्याच्या आवाराबाहेर पाय ठेवला तर अटक करू, अशी ‘वॉर्निंग’ दिली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER