प्रजासत्ताकदिन आणि सिनेमातील देशभक्तिपर डायलॉग

Baby - Krantiveer - Raazi

परवा आपण सगळे देशाचा ७२ वा प्रजासत्ताकदिन (Republic Day) साजरा करणार आहोत. नेहमीप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लाल किल्ल्यावरून देशाला संबोधतील. प्रजासत्ताकदिनानिमित्त राजपथावर भारताच्या शक्ती, संस्कृतीचे प्रदर्शन केले जाते. भारतीय सैन्यदलाची ताकद यावेळी मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते. यात सैन्यदलाकडे असलेल्या रणगाड्यांपासून विविध प्रकारच्या शस्त्रांचे प्रदर्शन घडवले जाते. ते पाहून शत्रू सैन्याच्या हृदयात नक्कीच धडकी भरते. यावेळी तर भारतीय वायुसेनेत नुकत्याच दाखल झालेल्या राफेल विमानांचाही समावेश आहे. ते पाहताना प्रत्येक भारतीयाचा ऊर अगदी तसाच अभिमानाने भरून येईल जसा सिनेमातील देशभक्तिपर संवाद ऐकताना येतो. सिनेमात जेव्हा देशभक्तिपर डायलॉग येतात तेव्हा प्रेक्षक टाळ्या वाजवल्याशिवाय राहात नाहीत. ‘उरी’ सिनेमातील ‘हाऊ इज द जोश’सारख्या संवादाने सगळ्या देशाला वेड लावले होते. देशाच्या ७२ व्या प्रजासत्ताकदिनानिमित्त आम्ही तुमच्यासमोर सादर करीत हिंदी सिनेमातील गाजलेले देशभक्तिपर संवाद.

मनोजकुमारनंतर गेल्या काही वर्षांत सनी देओल, अक्षयकुमार, जॉन अब्राहमसह काही नायक देशभक्त नायकाची भूमिका साकारू लागले आहेत. यात आमिर खान, सलमान खान, शाहरुख खान आणि हृतीक रोशनचाही समावेश आहे. ‘उरी’ सिनेमाचा उल्लेख झालेलाच आहे. विकी कौशलनेही तोच मार्ग पकडलेला आहे. त्याने अभिनय केलेल्या ‘उरी’ सिनेमात देशाच्या नवीन स्थितीवर भाष्य करणारा डायलॉग खूपच टाळ्या घेणारा होता. हा डायलॉग होता- ‘ये नए जमाने का हिन्दुस्तान हैं, ये घर में घुसेगा भी और मारेगी भी.’

अक्षयकुमारने (Akshay Kumar) हॉलिडे (Holiday), बेबी (Baby) असे काही देशभक्तिपर सिनेमे केले आहेत. हॉलिडे सिनेमातील ‘रिलिजन वाला जो कॉलम होता है, उस में हम बोल्ड में इंडियन लिखते हैं’ हा डायलॉग खूपच लोकप्रिय झाला होता. देशाच्या सैन्यदलावर आधारित ‘अब तुम्हारे हवाले वतन’ सिनेमात अक्षयकुमार म्हणतो, आओ झुक कर सलाम करें, उन्होंने जिनके हिस्से में ये मुकाम आया है … किस कदर खुश नसीब है वो लोग … खून जिनका वतन के काम आता है …

‘बॉर्डर’ (Border) सिनेमात भारतीय सैन्याच्या शौर्याची गाथा सादर करण्यात आली होती. या सिनेमात सनी देओलच्या (Sunny Deol) तोंडी एक डायलॉग होता- ‘हम तो किसी दूसरे की धरती पर नजर भी नहीं डालते … लेकिन इतने नालायक भी नहीं … कोई हमारी धरती मां पर नजर डालें और हम चुप-चाप देखते रहें’ हा डायलॉग सुपरहिट होता.

सनी देओलनेच ‘गदर एक प्रेमकथा’ (Gadar: Ek Prem Katha) मध्ये थेट पाकिस्तानात जाऊन आपल्या पत्नीची सुटका केली होती. या सिनेमात सनी म्हणतो, हमारा हिंदुस्तान ज़िंदाबाद था, ज़िंदाबाद है, और ज़िंदाबाद रहेगा चाहे हमें एक वक़्त की रोटी ना मिले, बदन पे कपड़े ना हो, सर पे छत ना हो … लेकिन जब देश की आन की बात आती है … तब हम जान की बाजी लगा देते हैं … हा अत्यंत कचकचित आणि टाळ्या घेणारा डायलॉग म्हटला होता सनी देओलने त्याच्या इंडियन सिनेमात. याच सिनेमात सनीने हम हाथ मिलाना भी जानते हैं, हाथ उखाड़ना भी … हम गांधी जी को पूजते हैं, चंद्र शेखर आजाद को भी … हा डायलॉगसुद्धा म्हटला होता. यात त्याने भारतीय जवानांच्या मनातील भावनाच व्यक्त केली होती.

‘क्रांतिवीर’मध्ये (Krantiveer) नाना पाटेकरने (Nana Patekar) दोन धर्मातील शत्रुतेबाबत वक्तव्य करताना दोघांचे रक्त एकच असल्याचे प्रेक्षकांवर बिंबवण्यासाठी एक सुपरहिट डायलॉग दिला होता. ये मुसलमान का खून, ये हिंदू का खून.. अब बता कौन मुसलमान का…. कौन हिंदू का, बता’ मात्र हा डायलॉग लोकांनी फक्त टाळ्या वाजवण्यासाठी उचलला. त्यावर अंमल केल्याचे मात्र अजूूनही दिसून येत नाही.

‘चक दे इंडिया’ (Chak De! India) सिनेमात शाहरुख खानने (Shahrukh Khan) महिलांच्या हॉकी टीमच्या कोचची भूमिका साकारली होती. देशाच्या वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलींना एका धाग्यात बांधण्यासाठी शाहरुख म्हणतो, मुझे स्टेट के नाम सुनाई नहीं देते और दिखाई भी नहीं देते … सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है इंडिया. त्याचा हा डायलॉग अंगावर रोमांच उभे करणारा होता.

अरबाज खानने (Arbaaz Khan) ‘मां तुझे सलाम’ (Maa Tujhhe Salaam) सिनेमात अनेक दशकांपासून म्हटला जात असलेला दूध मांगोगे तो खीर देंगे…कश्मीर मांगोगे तो चीर देंगे डायलॉग म्हटला होता.

आलिया भटनेही (Alia Bhatt) ‘राजी’ (Raazi) सिनेमात भारतासाठी पाकिस्तानात जाऊन काम करणाऱ्या गुप्तहेराची भूमिका केली होती. या सिनेमात आलिया म्हणते, हमारे इतिहास में ऐसे कई लोग हैं जिन्हें कोई इनाम, कोई मेडल नहीं मिला। हम उनका नाम तक नहीं जानते। ना ही उन्हें पहचानते हैं। सिर्फ वतन के झंडे पर अपनी याद छोड़ जाते हैं. तिचा हा डायलॉग डोळ्यात पाणी आणणारा होता.

आमिर खानने (Aamir Khan) ‘रंग दे बसंती’ (Rang De Basanti) सिनेमात अब भी जिसका खून ना खौले वो खून नहीं पानी है, जो देश के काम ना आए वो बेकार जवानी है… हा डायलॉग म्हटला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER