प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

मुंबई : भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ.राजेंद्र प्रसाद (Dr. Rajendra Prasad) यांनी 26 जानेवारी 1950 रोजी 21 तोफेच्या सलामी नंतर भारतीय राष्ट्रध्वज फडकवून भारतीय प्रजासत्ताकाच्या ऐतिहासिक जन्माची घोषणा केली. ब्रिटिशांच्या राजवटीतून मुक्त झाल्याच्या 894 दिवसानंतर आपला देश स्वतंत्र राज्य बनला. तेव्हा पासून आजतायगत दरवर्षी संपूर्ण देश भरात प्रजासत्ताक दिन (Republic Day) अभिमानाने आणि उत्साहात साजरा केला जातो.

ह्या प्रवासाची 1930 मध्ये एक स्वप्नाच्या रूपात कल्पना केली आणि आपल्या क्रांतिवीरांनी सन 1950 मध्ये ह्याला प्रजासत्ताक च्या रूपात साकार केले. तेव्हा पासून भारताची निर्मिती धर्मनिरपेक्ष, लोकशाही राष्ट्र म्हणून झाली आणि एक ऐतिहासिक घटना घडली.

31 डिसेंबर 1929च्या मध्य रात्री भारतीय राष्ट्रीय कांग्रेसच्या लाहोर अधिवेशनात देशाला स्वतंत्र करण्यासाठी पुढाकार घेतला गेला. या अधिवेशनाचे अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. या बैठकीत उपस्थित असलेले सर्व क्रांतिवीरांनी ब्रिटिश सरकारच्या राजवटीतून भारताला स्वतंत्र करणे आणि पूर्णपणे स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी 26 जानेवारी 1930 रोजी ‘स्वातंत्र्य दिन’ म्हणून एक ऐतिहासिक पुढाकार,घेण्याची शपथ घेतली. भारताच्या त्या वीरांनी आपल्या लक्षाला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे भारत खरोखर स्वतंत्र देश झाला.

त्या नंतर भारतीय संविधान सभेची पहिली बैठक 9 डिसेंबर 1946 रोजी झाली, या मध्ये भारतीय नेते आणि ब्रिटिश कॅबिनेट मिशन सहभागी झाले. भारताला संविधान देण्याच्या बाबत बऱ्याच चर्चा, शिफारशी आणि वाद विवाद झाले. बऱ्याच वेळा सुधारणा केल्यावर भारतीय घटनेला अंतिम रूप देण्यात आले. जे 3 वर्षा नंतर म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 रोजी अधिकृतपणे स्वीकारले.

या वेळी डॉ राजेंद्र प्रसाद ह्यांनी भारताचे प्रथम राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाला, पण या स्वतंत्रतेची खरी भावना 26 जानेवारी 1950 रोजी व्यक्त केली गेली. इर्विन स्टेडियम वर जाऊन राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. आणि अशा प्रकारे प्रजासत्ताक म्हणून भारतीय राज्यघटना अस्तित्वात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER