ठाकरे सरकारविरुद्ध ३०२ कलमाखाली गुन्हा नोंदवा; प्रवीण दरेकरांची मागणी

CM Uddhav Thackeray - Pravin Darekar

मुंबई :- पगार मिळत नसल्याने एसटीच्या दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी ठाकरे सरकारविरोधात (Thackeray Government) ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा, अशी मागणी भाजपाचे (BJP) आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी (Pravin Darekar) केली.

एसटी कर्मचाऱ्यांना गेले तीन महिने पगार न मिळाल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. गेल्या दोन दिवसांत एसटीच्या दोन कर्मचा-यांनी पगार मिळत नसल्यामुळे आत्महत्या केली आहे. तरीही हे ठाकरे सरकार अजूनही झोपले आहे. त्यामुळे या एसटी कर्मचा-यांच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या ठाकरे सरकारवर ३०२ कलमाखाली मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी आग्रही मागणी दरेकरांनी केली. एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिवाळीपूर्वी द्या; अन्यथा भाजपा आंदोलन करेल, असा इशारा दिला.

आत्महत्या करणारा हा एसटीचालक मूळ बीडमधील राहणारा आहे. या चालकाला काम केलेल्या दिवसापर्यंतचा पगार देण्यात आलेला आहे, असा दावा एसटीकडून केला जात आहे. आज पगार दिला नाही, तर कर्मचारी आक्रोश आंदोलन करणार आहेत.

ही बातमी पण वाचा : …. ठाकरे सरकार परिवहनमंत्री अनिल परब यांना का अटक करत नाही? – भातखळकर यांचा प्रश्न

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER