भारताला योग्य प्रत्युत्तर देऊ; इम्रान खानची धमकी

Imran Khan's threat

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने हल्ला केल्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक घेतली.

या बैठकीनंतर इम्रान खान म्हणाले की – हा हल्ला करून भारताने अवाजवी आक्रमकता दाखवली. पाकिस्तान योग्य वेळी, स्वत:च्या पसंतीच्या ठिकाणी प्रत्युत्तर देईल.

ही बातमी पण वाचा:- बिथरलेल्या पाकीस्तानने सैन्यांना दिले सज्ज राहण्याचे आदेश

दरम्यान, बालाकोट येथे हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य केले असून या हल्ल्यात ३५० दहशतवादी मारले गेल्याचे माहिती आहे. भारताच्या या कारवाईमुळे पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक बोलावली. या बैठकीला पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थ मंत्री आणि पाकिस्तानमधील सुरक्षा दल व सैन्याचे प्रमुख उपस्थित होते.

या पार्श्वभूमीवर पाकिस्तान संसदेचे संयुक्त अधिवेशन घेण्याचा निर्णय देखील बैठकीत घेण्यात आला, असे इम्रान खान यांनी सांगितले.