बीडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी शरद पवार यांच्याकडून इतिहासाची पुनरावृत्ती?

Sharad Pawar

बीड : बीडमध्ये (Beed) राष्ट्रवादीची ताकद वाढविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी राजकीय खेळी खेळली आहे . मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माजलगावच्या अशोक डक यांची नियुक्ती करण्यात आली . शरद पवार यांनी अशोक डक यांना संधी देऊन माजलगाव विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती केल्याचे दिसत आहे .

विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये (MVA) मंत्रिपद न मिळाल्याने माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी राजीनामा दिला होता .या पार्श्वभूमीवर डक यांना मुंबईच्या बाजार समितीवर केलेली नियुक्ती पक्षाची ताकद वाढविण्याचा भाग असल्याचे राष्ट्रवादीतून सांगितले जात आहे.

चार दशकांपूर्वी शरद पवार यांच्या पुलोदच्या प्रयोगात तत्कालीन उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांनी साथ सोडल्यानंतर त्यांचा गोविंदराव डक यांच्या माध्यमातून पराभव केला होता. आता त्याचीच पुनरावृत्ती होत असल्याचे चित्र आहे .

दरम्यान १९७८ ला शरद पवार यांनी काँग्रेस फोडून जनता पक्षाच्या मदतीने पुलोद स्थापन करून तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे सरकार पाडले आणि मुख्यमंत्री बनले. तेव्हा माजलगावचे काँग्रेसचे आमदार सुंदरराव सोळंके यांनी शरद पवारांना साथ देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले. मात्र इंदिरा गांधी यांनी ८० मध्ये सरकार बरखास्त केल्यानंतर मध्यावधी निवडणुकी सुंदरराव सोळंके यांनी पवारांची साथ सोडत काँग्रेसबरोबरच जाणे पसंत केले. त्यावेळी माजलगाव मतदारसंघातून सुंदरराव सोळंके यांचेच सहकारी गोविंदराव डक यांना उमेदवारी देऊन पवारांनी सोळंके यांचा पराभव केला होता.

ही बातमी पण वाचा : पवारांचे सभागृहात गैरहजर राहणे म्हणजे मोदी सरकारचे समर्थन नव्हे, हे आहे कारण !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER