केवळ कृषी कायदे मागे घेतल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत – अण्णा हजारे

Anna Hazare

अहमदनगर :- केवळ कृषी कायदे मागे घेतले म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील असे नाही. दिल्लीतील आंदोलन व्यापक नसून सिमीत आहे, असे मत अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी व्यक्त केले आहे.

विविध विषयांवर आंदोलने करणाऱ्या अण्णांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनातही सहभागी व्हावे, अशी मागणी होती. त्यासाठी दिल्लीतील शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ राळेगणसिद्धीला येऊन गेले. सुरुवातीला अण्णांनी या आंदोलनास पाठिंबा देत एका दिवसाचे उपोषणही केले होते. आपल्या जुन्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा दिल्लीत आंदोलन करण्याची घोषणाही हजारे यांनी केली. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी मैदान आणि परवानगी मिळावी, यासाठी त्यांनी अर्जही केला आहे.

दरम्यान, मधल्या काळात भाजपाच्या एका शिष्टमंडळाने हजारे यांची भेट घेऊन नव्या कृषी कायद्याच्या मराठी प्रती त्यांना दिल्या. दिल्लीत आंदोलन न करण्याची विनंती केली. मात्र, हजारे यांनी त्यांची ही विनंती धुडकावून लावली. मात्र, नव्या कृषी कायद्यांविषयी आताच काहीही बोलणार नाही, असे शिष्टमंडळाला सांगितले. प्रसार माध्यमांशी बोलतानाही आता हजारे यांची हीच भूमिका आहे. हजारे दिल्लीत आंदोलन करणार असले तरी त्यांचा या आंदोलानाशी आणि विशेषत: नव्या कृषी कायद्यांशी काहीही संबंध नसेल, हेही आता स्पष्ट झाले आहे.

ही बातमी पण वाचा : शेतकरी कर्जमाफी फसवणूक प्रकरण: ईडीने 255 कोटींची संपत्ती केली जप्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER