एमपीएससीसाठी खुल्या प्रवर्गाची कमाल मर्यादेची अट रद्द करा – रोहित पवार

Rohit pawar

मुंबई :- एमपीएससी परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल मर्यादेची अट रद्द करा आणि एसईबीसीचा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा ईडब्लूएस यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचे एमपीएससीने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केली आहे. याबाबत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिले आहे. अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (Maharashtra Public Service Commission) काही दिवसांपूर्वी परीक्षेत यूपीएससीसारखा पॅटर्न राबवण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना किती वेळा परीक्षा देता येईल याबाबत नवीन नियम लागू करण्यात आले. यानुसार, खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल सहा संधी उपलब्ध असतील. ओबीसी प्रवर्गातील नऊ तर अनुसूचित जाती आणि जमातीच्या उमेदवारांना संधीची मर्यादा नसेल.

परंतु एमपीएससीमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आधीच वयाची अट असल्याने कमाल संधीची अट घालण्याची गरज नाही. ही अट घातल्यामुळे खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांवर अन्याय होतो असे रोहित पवार यांनि म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : दिलखुलास रोहित पवार, रस्त्यावरील हातगाडीवर स्वत: बनवली अंडा भुर्जी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER