कृषी कायदे रद्द करणे म्हणजे शेतकरी आणखी मागे जाणे – चेतन भगत

chetan bhagat

मुंबई : कोणतेही बिल पूर्णपणे योग्य नसते, त्यात बदल केले जाऊ शकतात. केंद्र सरकारचे कृषी कायदे रद्द केल्यास त्याचे शेतकऱ्यांवर विपरीत परिणाम होतील. शेतकरी आणखी मागे जाईल, असे म्हणून लेखक चेतन भगत यांनी या कायद्यांचे समर्थन केले.

याबाबत केलेल्या ट्विटमध्ये ते म्हणाले – “कोणताही कायदा हा परिपूर्ण नसतो. जर कृषी कायद्यांविरोधात भीती आहे तर त्यावर बसून, चर्चा करुन, बदल करुनच तोडगा निघू शकतो. परंतू कायदा रद्द करण्याची मागणी म्हणजे भारतीय कृषी क्षेत्रासाठी एक पाऊल मागे गेल्यासारखं होईल. यामध्ये छोट्या उद्योगांतून बाहेर येत भांडवलशाहीची आणि मोठ्या सुधारणेची गरज आहे.”

केंद्राने केलेले कृषी कायदे रद्द करावे, या मागणीसाठी दिल्लीत शेतकरी आंदोलन करत आहेत. देशात वातावरण तापले आहे. १५ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन सुरू आहे. शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही तोडगा निघालेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER