कृषी कायदे रद्द करा; शेतकऱ्यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

Repeal agricultural laws, farmers run to the Supreme Court

दिल्ली :  कृषी कायदे रद्द (Repeal agricultural laws) करा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली आहे. केंद्र सरकारने लागू केलेले कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत, कॉर्पोरेटच्या हिताचे आहेत असे शेतकऱ्यांनी म्हटले आहे.

भारतीय किसान युनियनने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. हे कायदे रद्द करा, या मागणीसाठी १६ दिवसांपासून शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. परवाच विरोधी पक्षातल्या पाच नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची या संदर्भात भेट घेतली आणि कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. कृषी कायदे तातडीने रद्द करण्यात यावेत अशी शेतकऱ्यांची आग्रही मागणी आहे. यासाठी कडाक्याच्या थंडीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER