५०० रुपयांची मदत करणाऱ्या शिक्षकाचे ऋण फेडले ३० लाखांचे शेअर देऊन !

V. Vaidyanathan

मुंबई :- गोष्ट आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेचे (IDFC First bank) सीईओ आणि एमडी व्ही. वैद्यनाथन (V. Vaidyanathan) यांची. फेसबुकच्या पोस्टने ही माहिती दिली आहे.

वैद्यनाथन त्यावेळी चेन्नईत राहात होते. मेसरातील बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये इंजिनीअरिंगमध्ये त्यांना प्रवेश मिळाला. तिथे जाऊन मुलाखत द्यायची होती. मात्र, भाड्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांना गणित शिकवणारे शिक्षक गुरदयाल सैनी यांनी त्यांना ५०० रुपये दिले. वैद्यनाथन यांना त्या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळाला, त्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले.

सैनी यांचे पैसे परत देण्यासाठी आणि त्यांचे आभार मानण्यासाठी वैद्यनाथन यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सैनी नोकरी सोडून गेले होते. वैद्यनाथन यांना  त्यांचा पत्ता मिळाला नाही. पण वैद्यनाथन हे सैनी यांचे देणे विसरले नाहीत.

खूप वर्षांनी वैद्यनाथन यांना एका जुन्या सहकाऱ्याकडून सैनी यांचा पत्ता मिळाला. ते आग्रामध्ये राहात असल्याचे कळले. वैद्यनाथन यांनी त्यांच्या नावे लाखोंचे शेअर करून आभार मानले.

याच महिन्यात आयडीएमसी फर्स्ट बँकेने स्टॉक एक्सचेंजमध्ये एक रेग्युलेटरी फाईल केली आहे. ज्यात वैद्यनाथन यांनी एक लाख इक्विटी शेअर सैनी यांच्या नावावर केल्याची माहिती दिली आहे. या शेअर्सची किंमत आता ३० लाख रुपये असल्याचे कळते. नोटिसीत म्हटले आहे. “व्ही.  वैद्यनाथन यांनी IFDC फर्स्ट बँक लिमिटेडमधील आपले १०,००० शेअर आपले शिक्षक गुरदयाल स्‍वरूप सैनी यांना ट्रान्सफर केले आहेत. कोणत्याही अटींशिवाय गिफ्ट म्हणून त्यांनी हे शेअर दिले आहेत. त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीला गुरूने केलेल्या मदतीचे त्यांनी आभार मानले आहेत.”

सोशल मीडियावर वैद्यनाथन यांचं खूप कौतुक होते आहे. नेटीजन्स म्हणतात – ही आहे खरी गुरू-शिष्याची परंपरा. आता खूप दुर्मिळ झाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER