‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ; रेणुका शहाणेंनी कंगना राणावतला झापले

Kangana Ranaut - Renuka Shahane

मुंबई : बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री कंगणा राणावतने (Kangana Ranaut) शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका करताना मुंबई (Mumbai) पाकव्याप्त काश्मीरसारखे वाटते, असे म्हटले होते . कंगणाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर सर्व स्तरावरून टीका करण्यात येत आहे . अशातच अभिनेत्री रेणुका शहाणे (Renuka Shahane) हिनेही कंगणाला खडसावले आहे.’उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’ ही मराठी म्हण ट्वीट करत तिने कंगनाला टोला हाणला आहे.

ताई आपल्याला जे राजकारण करायचं असेल ते आपल्या गावाला जाऊन जरूर करा. जिथे तुम्हाला काम मिळालं, ओळख मिळाली त्या शहराचा आणि राज्याचा मान ठेवा. आमचं प्रेम आहे आणि आम्हाला अभिमान आहे मुंबईचा!, असं म्हणत मराठी अभिनेता सुबोध भावेनेही (Subodh Bhave) कंगणा राणावतला फटकारले आहे.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूनंतर अनेक वक्तव्यांमुळे अभिनेत्री कंगना रणौत चर्चेत आली आहे. तिन ट्विटरवरून देखील विविध व्यक्तींवर टीका करण्याची संधी सोडली नाही आहे. दरम्यान कंगनाने नुकतेच ट्वीट करत शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. तिने या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला जाहीरपणे धमकी दिली आहे आणि मुंबईत न परतण्यास सांगितले आहे. आधी मुबंईच्या रस्त्यावर आझादी ग्राफिटीज आणि आता जाहीर धमकी मिळते आहे. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने उपस्थित केला .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER