रेणू शर्माची तक्रार राजकीय दबावातून; राजकीय पोळी भाजण्यासाठी मुंडेंवर आरोप – गृहमंत्री

Dhananjay Munde- Renu Sharma-Anil Deshmukh

नागपूर :- राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर एका पार्श्वगायक असलेल्या रेणू  शर्मा नावाच्या तरुणीने बलात्काराचा आरोप केला होता. त्या आरोपानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले. त्यातच या आरोपानंतर धनंजय मुंडे यांनी रेणू  शर्मा (Renu Sharma) हिची बहीण  करुणा शर्मा आपली पत्नी असल्याचे कबूल  केले तसेच करुणापासून दोन मुलं असून त्या मुलांना आपलेच नाव दिल्याचेही मुंडे यांनी कबुली दिल्यानंतर या प्रकरणातील गूढ आणखीनच वाढले. एवढेच नाही तर रेणूचा  गंभीर आरोप आमि धनंजय मुंडेंची बहिणीसोबत संबंध असल्याची कबुली यामुळे धनंजय मुंडेंचे राजकीय करिअर दावणीला लागले होते. मात्र, आठवडाभरातच रेणू  शर्मा या तरुणीने आपली तक्रार मागे घेतली.

त्यानंतर आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी या प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात राजकीय दबावातून तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य पार्श्वगायिका रेणूने  केल्याचा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. तसेच हे प्रकरण संपलेलं आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी  धनंजय मुंडे यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप झाले होते, त्याबाबतही रेणूने आपल्या प्रतिज्ञापत्रात सांगितल्याची माहिती अनिल देशमुख यांनी दिली. ते नागपुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.

“रेणू शर्माने तक्रार मागे घेतली हे आपल्याला सर्वांना माहीत आहे. राजकीय दबावापोटी तक्रार करायला लावली होती, अशा पद्धतीचं वक्तव्य रेणू शर्माने  केलेलं आहे. हा विषय आता संपला आहे. मात्र, राजकारणाची पोळी भाजण्यासाठी धनंजय मुंडेंवर ज्या पद्धतीने आरोप केले ते चुकीचे होते, या सगळ्याबद्दल रेणू शर्मानं सांगितलं आहे. ” असं देशमुख म्हणाले.

तक्रार मागे घेतल्यानंतर रेणू शर्माने  काय स्पष्टीकरण दिले होते?

रेणू शर्मा हिने  धनंजय मुंडे यांच्याविरोधातील तक्रार मागे घेतल्यानंतर स्पष्टीकरण दिलं होतं. “मी धनंजय मुंडे यांच्याविरोधात लग्नाचं आश्वासन देऊन बलात्काराचा जो आरोप केला होता त्यावर मी माझी भूमिका स्पष्ट करत आहे. धनंजय मुंडे आणि माझ्या बहिणीच्या नात्यात काही दिवसांपासून तणाव होता. त्यांचं हे प्रकरण न्यायालयात गेल्याने मी मानसिक तणाव आणि दबावात आले होते. मात्र, आता विरोधी पक्षदेखील त्यांच्याविरोधात जात असल्याच पाहून राजकारणातील मोठ्या षडयंत्राचा बळी ठरत आहे असं मला वाटतंय. माझी लग्नाचं आश्वासनं  न पाळण्याची किंवा बलात्काराची कोणतीही तक्रार नाही. तसेच माझा कोणताही अयोग्य फोटो किंवा व्हिडीओदेखील नाही. मी हे सर्व अगदी विचारपूर्वक सांगत आहे.” असं रेणू  शर्माने  स्पष्टीकरण दिलं होतं.

ही बातमी पण वाचा : शक्ती कायद्यात खोट्या तक्रारी करणाऱ्या महिलांवर कारवाईची तरतूद : अनिल देशमुख

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER