धनंजय मुंडे प्रकरण : तक्रारदार महिलेचा यू-टर्न? मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे, पण…

Renu Sharma - Dhananjay Munde

मुंबई :  बलात्काराच्या आरोपावरून अडचणीत आलेले सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना तूर्तास राष्ट्रवादी पक्षश्रेष्ठींकडून दिलासा मिळाला आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी व्हावी, त्यानंतर बघू, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बैठकीत घेतली आहे. रात्री उशिरा  पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. धनंजय मुंडे यांच्यावर होणारे आरोप ब्लॅकमेलिंग असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी म्हटलं आहे.

याबाबत सविस्तर खुलासाही धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी सोशल मीडियावरून केला आहे. या संपूर्ण घटनेत पोलीस सहकार्य करत नाही, असा आरोप तक्रारदार महिलेच्या वकिलांनी केला होता.  धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानं त्यांचं राजकीय जीवन धोक्यात आलं होतं; परंतु भाजपा नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे मनीष धुरी यांनी या प्रकरणात उडी घेतल्याने संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण आले आहे .


लिंक;

तक्रारदार महिलेने ट्विटमध्ये म्हटलं की, एक काम करा, तुम्ही सगळ्यांनी निर्णय घ्या, काहीही माहिती नसताना जे मला ओळखत नाहीत आणि जे ओळखतात ते चुकीचा आरोप करत आहेत. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवा, मी माघार घेते जी तुमची इच्छा आहे. जर मी चुकीची होती तर हे लोक आतापर्यंत पुढे का आले नाहीत? मी मागे हटली तरी मला माझ्यावर गर्व आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी एकटीच अशी मुलगी आहे जी लढतेय. मी कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि हे लोक माझ्याविरोधात एकत्र आलेत, तुम्हाला जे हवं ते लिहा, असं सांगत रेणू  शर्माने ‘देव तुमचं भलं करो’ असे ट्विटमध्ये लिहिले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER