शरद पवारांच्या भेटीनंतर गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेवर?

Sharad Pawar-Ananad Shinde

मुंबई : सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या तिकिटावर आनंद शिंदे (Anand Shinde) विधानपरिषद निवडणूक लढवणार असल्याची चर्चा जोर धरत आहे. त्यामुळे विधिमंडळातही आता ‘खणखणीत’ शिंदेशाही आवाज घुमण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे .

आनंद शिंदे राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचे याआधीही बोलले जात होते. काही दिवसांपूर्वी त्यांनी  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(Sharad pawar) यांची भेट घेतली होती. त्यानंतर आनंद शिंदेंची विधानपरिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. अखेर लांबलेल्या राज्यपाल नियुक्त विधानपरिषद निवडणुकीतून शिंदे राजकीय आखाड्यात उतरण्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतच आनंद शिंदे रिंगणात उतरणार असल्याचं बोललं जात होतं. आनंद शिंदे यांना महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ किंवा माळशिरस या राखीव मतदारसंघातून आनंद शिंदे निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात होती, मात्र तसे झाले नाही .

ह्या बातम्या पण वाचा : 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER