प्रख्यात संगीतकार बप्पी लाहिरी यांनाही कोरोनीच लागण

Maharashtra Today

बॉलिवूडवरील कोरोनाचे संकट काही कमी होताना दिसत नाही. रोज कोण ना कोण तरी कोरोनाची शिकार झाल्याची माहिती समोर येत आहे. या दुसऱ्या लाटेत पहिल्या फळीतील अनेक कलाकार कोरोनाच्या तावडीत सापडले आहेत. आता या यादीत प्रख्यात संगीतकार बप्पी लाहिरी (Bappi Lahiri) यांचेही नाव समाविष्ट झाले आहे. बप्पी लाहिरी यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांना उपचारासाठी ब्रीच कॅन्डी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सुधारत असल्याची माहिती त्यांच्या मुलीने रिमाने (Reema Lahiri) सोशल मीडियावर दिली आहे.

बप्पी लाहिरी बॉलिवूडमध्ये ‘डिस्कों किंग नावाने फेमस आहेत. त्यांनी ८० आणि ९० च्या दशकात बॉलिवूडमध्ये डिस्को गाण्यांची सुरुवात केली होती. ‘डिस्को डांसर’, ‘नमक हलाल’, ‘डांस डांस’, ‘शराबी’, ‘साहेब’, ‘हिम्मतवाला’, ‘वारदात’, ‘चलते चलते’ हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत. एकता कपूरच्या (Ekta Kapoor) विद्या बालन (Vidya Balan) अभिनीत ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमासाठी त्यांनी त्यांचे सुपरहिट गीत ‘ऊ लाला ऊ लाला’ गाऊन गायक म्हणून पुन्हा बॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती.

रिमा लाहिरी यांनी सोशल मीडियावर एक पत्रक पोस्ट केले आहे. यात रिमाने म्हटले आहे, बप्पी लाहिरी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना हॉस्पिटमध्ये दाखल करण्यात आले असून सध्या ते आयसीयूमध्ये आहेत. मात्र त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. बप्पी दांनी कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खूप सावधगिरी बाळगली होती. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यात कोरोना व्हायरसची हलकी लक्षणे आहेत. ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये डॉ. उडवाडिया यांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. ते लवकरच चांगले होतील आणि घरी परततील. त्यांच्यासाठी सतत प्रार्थना करीत असल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार असेही रिमाने या पत्रकात म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button