मिरजेतील प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

PM Narendra Modi

सांगली : प्रभू श्री रामचंद्र यांनी शिवलिंग स्थापित झालेल्या मिरजेच्या (Miraj) कृष्णा घाटावरील प्राचीन मार्कंडेश्वर मंदिराचा (Markandeshwar temple) जीर्णोद्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते होणार आहे. १ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या काळात मिरजेतील कृष्णाकाठ येथील मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मुख्य कार्यक्रम होणार असल्याची माहिती माहिती सुर्यपीठ मुरली मंदिर द्वारका जुना आखाडाचे पिठाधिश्वर जगद्गुरु सूर्याचार्य श्री कृष्णदेव नंद गिरीजी महाराज ( द्वारका, गुजरात, जुना आखाडा ) यांनी दिली आहे.

गिरीजी महाराज म्हणाले की, मिरजेच्या कृष्णा घाटावरील मार्कंडेश्वर ऋषींनी स्थापित केलेल्या या ४०० वर्षांपूर्वीच्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा मानस आम्ही व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना निमंत्रित करण्यात आले आहे. याच निमित्ताने देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी ११ हजार रक्ताच्या बाटल्या मिरजतून देशाच्या सीमेवर पाठवल्या जाणार आहेत. याचबरोबर याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वजनाचीही रक्त तुला केली जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER