नूतनीकरण केलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाला डॉ. विनय नातू यांनी दिली भेट

Vinay Natu

रत्नागिरी/प्रतिनिधी :- भाजप उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी नुकतीच नूतनीकरण केलेल्या कामथे उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने कामथे रुग्णालयात सुसज्ज केलेले तीन वॉर्ड, आयसीयु युनिटची पाहणी त्यांनी केली. चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने कामथे उपजिल्हा रुग्णालयातील सुसज्जित केलेल्या तीन वाॅर्डचे लोकार्पण मंगळवारी आ. भास्कर जाधव, आ. शेखर निकम, माजी आ. रमेश कदम यांच्या हस्ते झाले. रत्नागिरी जिल्ह्यात करोनाग्रस्त वाढत आहेत.

भविष्याच्या दृष्टीने प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या संकल्पनेतून कामथे उपजिल्हा रुग्णालयातील वॉर्ड सुसज्ज करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी परवानगी दिली. त्यानंतर ही जबाबदारी चिपळूण तालुका मुस्लिम समाज या संस्थेकडे देण्यात आली. संस्थेने काही दिवसांतच १० लाख रुपये खर्च करून रुग्णालयातील तीन वॉर्ड सुसज्ज केले. या उपक्रमाचे लोकार्पण झाल्यावर या रुग्णालयाला बुधवारी डॉ. नातू यांनी भेट दिली. डॉ. मारुती म्हात्रे यांनी डॉ. नातू यांना य‍ासंदर्भातील माहिती दिली. यावेळी भाजप उपजिल्हाध्यक्ष रामदास राणे, चिपळूण तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, जिल्हा चिटणीस संतोष वरेकर, चिपळूण माजी शहराध्यक्ष महेश दीक्षित, ओबीसी तालुकाध्यक्ष संतोष मालप, मंदार कदम आणि कर्मचारी उपस्थित होते. यावेळी डॉ. विनय नातू यांनी चिपळूण तालुका मुस्लिम समाजाने आरोग्य सेवेसाठी केलेल्या योगदानाचे कौतुक केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER