नामांतर : पुण्याचे ‘जिजापूर’ करा; संभाजी ब्रिगेडची मागणी

Rename-Make Pune 'Jijapur'; Demand for Sambhaji Brigade

पुणे : औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यावरून सध्या राजकीय पक्षांमध्ये शाब्दिक चकमकी झडत असतानाच, पुण्याच्या नामांतराची मागणी पुढे आली आहे. संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) पुण्याचे नामांतर ‘जिजापूर’ (Jijapur) करण्याची मागणी केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यास वेळ लागत असेल तर पुण्याला राष्ट्रमाता जिजाऊंचे नाव देऊन या शहराचे नामांतर ‘जिजापूर’ असे करा, अशी मागणी केली. शिंदे म्हणालेत, बेचिराख झालेले पुणे शहर जिजाऊंनी वसवले. पुण्याला जिजाऊंचा इतिहास आहे. पुणे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचे प्रतीक असल्यामुळे नामांतराचे राजकारण करू नका. इतिहासातील प्रतीकांचा आदर करायला शिका.

राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर शिंदे यांनी टीका केली. टिळक वाड्यात बसून छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास थोरात यांना कळणार आणि पचणारही नाही. आम्हाला आमचा वारसा गौरवपूर्ण चालवू द्या, असा चिमटाही त्यांनी काढला.

ही बातमी पण वाचा : औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्यास आरपीआयचा विरोध- रामदास आठवले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER