या घरगुती उपायांनी दूर करा नको असलेले केस

wax

आपल्याला शरीरावर केस नको असतात. घरच्या घरी काही सोपे उपाय करून या अनावश्यक केसांपासून तुम्ही सुटका मिळवू शकता. मुंबईच्या पर्सनल केअर एक्स्पर्ट अंजू गर्ग हेअर रिमूव्हलच्या काही नैसर्गिक टिप्स सांगत आहेत. पण हे करताना सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सौंदर्यतज्ञ स्वाती खिलरानी सांगतात की, हा कायमस्वरूपी उपाय नाही. हे ट्राय करण्यापूर्वी एखाद्या तज्ञाचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. त्वचेमध्ये जळजळ होत असेल तर हे करू नका. यानंतर मॉइश्चरायजर अवश्य लावा.

जाणून घ्या केस काढण्याचे सोपे उपाय…

  • कॉफीचे बी :- कॉफीचे बी बारीक करून त्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून पेस्ट बनवा. त्वचेवर लावून सुकू द्या. यानंतर हलक्या हाताने काढून घ्या.

  • कच्ची अंडी, कॉर्नफ्लोर आणि साखर :- या पदार्थांची घट्ट पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर सेलोफेन किंवा कपड्याच्या पट्टीने केसांच्या विरुद्ध दिशेने ओढून काढा.

  • मध, लिंबीचा रस आणि साखर :- तिन्हीही पेस्ट बनवून नको असलेल्या केसांवर लावा. सुकल्यानंतर हळूहळू केसांच्या विरुद्ध दिशेने काढा.

  • कच्ची पपई आणि हळद :- कुस्करलेली पपई आणि हळद पावडरची पेस्ट बनवून लावा. सुकल्यानंतर हलक्या हाताने मालिश करून काढा.

wax

  • दही, मलाई आणि मोहरी :- या तिन्हींची पेस्ट बनवून नको असलेल्या केसांवर लावा. सुकल्यानंतर हळूहळू घासून काढा.

  • ब्राउन शुगर :- नको असलेल्या केसांची जागा ओली करून त्यावर ब्राउन शुगर घासावी. काही दिवसांत केस कमी होतील.

  • डाळ, बटाटे, मध आणि लिंबाचा रस :- भिजवलेल्या डाळीमध्ये इतर पदार्थ मिसळून पेस्ट बनवा. केसांच्या त्वचेवर ३० मिनिटे लावून ठेवा. नंतर घासून काढा.

  • हळद, बेसन आणि मध :- या तिन्हींची घट्ट पेस्ट बनवून केसांच्या ठिकाणी लावा. सुकल्यानंतर हलक्या हातांनी घासून काढा.

  • मीठ :- कोमट पाण्यात मीठ मिसळून कॉटनच्या कपड्याने बॉडीची मसाज करा. काही दिवसांतच केस कमी होतील.

ही बातमी पण वाचा : वॅक्सिंगच्या त्रासापासून वाचायचंय? मग अशी घ्या काळजी