बेळगावातील लाल-पिवळा ध्वज हटवा, या भागात शिवसेना कन्नड व्यवसायिकांचे व्यवहार पडणार बंद

Shiv Sena - Vijay Devane - Sanjay Pawar

कोल्हापूर : बेळगाव महानगरपालिकेसमोर उभारलेला ‘कर्नाटक रक्षण वेदिका’ संघटनेचा लाल- पिवळा ध्वज हटवा अशी मागणी शिवसेनेने केली. हा ध्वज हटवण्यात आला नाही तर २० मार्च रोजी शिवसेना (Shiv Sena) कोल्हापूरसह (Kolhapur) सांगली (Sangli) सातारा (Satara) जिल्ह्यातील कन्नड व्यवसायिकांचे व्यवहार बंद पाडेल, असा इशारा शिवसेनेने दिला.

पत्रपरिषदेत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे (Vijay Devane) आणि संजय पवार (Sanjay Pawar) म्हणालेत की, २० मार्च रोजी या तीन जिल्ह्यातील एकाही कन्नड व्यवसायिकाचे दुकान चालू देणार नाही. त्यानंतरही कर्नाटक सरकारला जाग नाही आली तर ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलन करू.

दोन दिवसापूर्वी शिवसेनेचे बेळगाव जिल्हाप्रमुखावर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना आक्रमक झाली आहे. महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड व्यवसायिकांना आता शिवसेनेने इशारा दिला आहे. बेळगाव महापालिकेसमोर गेल्या कित्येक दिवसांपासून बेकायदेशीररित्या लाल-पिवळा ध्वज कन्नड संघटनांनी लावला आहे. अनेक वेळा रस्त्यावर उतरून शिवसेनेने हा ध्वज हटवण्याची मागणी केली पण, तो ध्वज अद्यापही हटवला गेला नाही, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER