मराठा आरक्षण समितीवरून चव्हाणांना हटवा एकनाथ शिंदेंना अध्यक्ष करा- नरेंद्र पाटील

Chavan-Patil-Shinde

मुंबई :- मराठा समाजाच्या समितीपदावरून राज्याच्या राजकारणात वाद विवाद पाहायला मिळत आहे. या समितीच्या पदावर कॉंग्रेसचे नेते अशोक चव्हाण आहेत. त्यांना या समितीच्या पदावरून हटवण्याची मागणी अनेक नेते करत आहेत. आता नरेंद्र पाटील यांनीही अशोक चव्हाणांच्या (Ashok Chavan) विरूद्ध सूर काढला आहे.

मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदावरुन अशोक चव्हाणांना हटवावं आणि एकनाथ शिंदेना मराठा समितीचे अध्यक्षपद द्यावं असं मत आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कराड इथं व्यक्त केलं आहे.

चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) मराठा आरक्षणांचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता अशा शब्दात त्यांनीच अशोक चव्हाणांना पदावरून काढण्याची मागणी केली आहे.

ते म्हणाले, शिवसेना – भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाच्या समितीच्या अध्यक्षपदी असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा प्रश्न योग्य पध्दतीने हाताळला होता. मात्र, सध्याचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यामुळे मराठा समाजाचं नुकसान झालं असल्याने त्यांना हटवावं. व मराठा समाजाच्या मुला मुलींसाठी मोठं योगदान असलेल्या एकनाथ शिंदे यांना अध्यक्षपद द्यावे अशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांच्याकडेही केली होती असं आण्णासाहेब पाटील अर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, ‘आम्ही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना विनंती केली होती की, एकनाथ शिंदे यांना मराठा समाजाची जी उपसमिती आहे, त्यांना अध्यक्ष करा. कारण ज्यावेळेला भाजप- शिवसेनेचे सरकार होतं. त्यावेळेच्या उपसमितीत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांनी खूप चांगल्या प्रकारे काम करत होते.

मराठा समाजाच्या मुले- मुलींच्यासाठी ठाणे जिल्ह्यामध्ये पहिले वसतिगृह जे झाले ते एकनाथ शिंदेनी केले. यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. परंतु आमची विनंती मुख्यमंत्र्यांनी मान्यच केली नाही. त्यांनी अशोकराव चव्हाणांना आणून बसवलं, त्यांनी मराठा समाजाला थर्ड लावला अशा शब्दात नरेंद्र पाटील यांनी चव्हाणांनावर टीका केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER