भुजबळ, वडेट्टीवार यांना मंत्रिमंडळातून काढा राज्यपालांना मराठा क्रांती मोर्चाचे निवेदन

Marathi Kranti Morcha & Governor

मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकानी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेऊन ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळातील दोन मंत्र्याची तक्रार केली. राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी मराठा समन्वयकांनी केली आहे. हे दोन्ही नेते मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचे काम करत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.

मराठा क्रांती मौचचि समन्वयक आणि छावा संघटनेच्या पदाधिकान्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी याची भेट घेतली. या शिष्टमंडळाने आरक्षणासंदर्भात विविध मागण्याचे निवदेन राज्यपालाना दिले. यावेळी शिष्टमंडळाने छगन भुजबळ आणि विजय वडेट्टीवार याची देखील तक्रार केली. दोन्ही नेते ओबीसी आणि मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत. दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचे काम ते करत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सांगून छगन भुजबळ माणि वडेट्टीवार याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER