नवीन लग्न झाल्यास ‘या’ गोष्टी लक्षात असू द्या

new marriage

विवाह हा संस्कार सोळा संस्कारातील एक गोड संस्कार आहे. त्यामधे दोन कुटुंब जोडली जातात. दोन मने एक होतात. पण अनेकदा लग्न झाले की काही दिवसातच वाद सुरु होतात. नवीन लग्न झाले असेल तर या चुका करु नका….नाही तर तुमच्या पार्टनरच्या मनात तुमची किंमत राहणार नाही. यासाठी खालील काही गोष्टी नक्की लक्षात असू द्या..

ही बातमी पण वाचा : अरेंज मॅरेज करताय? मग, आपल्या होणाऱ्या जोडीदाराला हे प्रश्न नक्की विचारा

  • लग्न किंवा लग्नानंतर रिसेप्शनला आलेला खर्च याबाबत पार्टनरसोबत चुकूनही चर्चा करु नका. या खर्चावरून पार्टनरसोबत बढाया मारल्याने तुमच्या नात्यात अंतर पडू शकते.

  • लग्नातील नातेवाईकांची चुकूनही पार्टनरसमोर खिल्ली उडवू नका. कधी कधी जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणी पार्टनरसोबत बोलताना नातेवाईकांची खिल्ली उडवली जाते. त्यामुळे त्यांना दुःख होऊ शकते.

  • तुमचा एक्स बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड यांच्यासोबत तुमच्या विद्यमान पार्टनरची तुलना अजिबात करू नका. कालतरांने यामुळे वाद निर्माण होऊन दुरावा निर्माण होईल.

  • तुमचे नाते जर घट्ट बनवायचे असेल तर, पार्टनरला अॅटीट्यूड दाखवण्यापासून दूर राहा.

  • पार्टनरसोबत त्याच्या कामावरून, किंवा नोकरीवरून रागावू नका. त्याला नेहमी प्रोत्साहन द्या.

ही बातमी पण वाचा : नात्यात खुश नाही?? तर मघ करा या गोष्टी..