‘सुडाचे होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा’, चित्रा वाघ यांचा टोला

Maharashtra Today

मुंबई : अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी ‘ही’ मंडळी भ्याडच म्हणावी लागतील, अशा शब्दात भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh)यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.

मागील तीन दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ महाविकास आघाडीवर कोणत्या ना कोणत्या कारणांवरुन हल्लाबोल करताना दिसत आहेत. आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर त्यांना जोरदार प्रत्युत्तर देऊन त्यांच्यावर पलटवार करत होत्या. मात्र वाघ यांनी चाकणकर यांना प्रत्युत्तर दिलेलं नव्हतं. बुधवारी एक ट्विट करत त्यांनी रुपाली चाकणकर यांना अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. या ट्विटमध्येही त्यांनी चाकणकर यांचं नाव घेतलेलं नाही.

अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर व त्यातही आवाज उठवणारी जर स्त्री असेल तर व्यक्तिगत आयुष्याचा मुद्दा बनवणारी “ही”मंडळी भ्याडच म्हणावी लागतील सूडाच्या भावनेतून होणारं राजकारण फार काळ टिकणारं नाही हे लक्षात ठेवा, असं चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी टीका केली होती. देशमुखांनी तर राजीनामा दिला आता प्रश्न आहे की नवा वसूली मंत्री कोण?, अशी घणाघाती टीका चित्रा वाघ यांनी केली होती.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button