‘काँग्रेसमुळेच तुम्ही सत्तेत हे लक्षात घ्या’, पटोलेंनी पुन्हा करवून दिली शिवसेनेला आठवण

Nana Patole - Uddhav Thackeray - Maharastra Today

मुंबई : राज्य सरकारमध्ये एकत्र असले तरी युपीएच्या अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षपदावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. दोन्ही पक्षाचे नेते आरोप-प्रत्योरोपांच्या फैरी झाडताना दिसून येत आहे. शिवसेनेचे खासदार आणि ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी युपीएला मजबूत करण्यासाठी नेतृत्व बदलाची मागणी केली आहे. त्यांनी यूपीएच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची निवड करण्याचा सल्लाही काँग्रेसला दिला. तसंच शरद पवार यांचं नेतृत्व स्वीकारा, अशी सूचनाही देऊन टाकली. त्यावर आता काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिवसेनेला (Shivsena) पुन्हा खडसावत सेनेच्या नेतृत्वाला एकप्रकारे इशारच देऊन टाकला.

नाना पटोले यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना शिवसेनवर आगपाखड केली. आमच्या नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल ते दररोज भाष्य करत आहेत. त्यांना अनेकदा सांगितलं की शिवसेना काही युपीएचा घटकपक्ष नाही. पण तरीही ते सातत्याने आमच्या नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांना आम्ही सांगितलं आहे की, आम्ही सरकार नाही पण सरकार आमच्यामुळे आहे. काँग्रेसमुळेच शिवसेना सत्तेत आहे हे लक्षात घ्यावे, अशा शब्दात नाना पटोले यांनी एकप्रकारे शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांना इशारा दिला दिला आहे. यापूर्वीही नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि सत्यजित तांबे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी संजय राऊत यांच्या भूमिकेवर आक्षेप नोंदवला होता. शिवसेनेनं आधी युपीएचा घटकपक्ष व्हावं, मग त्यांच्या मतांचा विचार केला जाईल, असा टोलाही तांबे यांनी संजय राऊतांना लगावला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button