शिवसेनेमुळे मुंबईत मराठी माणसाचा पगडा कायम आहे हे लक्षात असू द्या – संजय राऊत

Chandrakant Patil-sanjay-raut

मुंबई :- ब्रिटिशांनी मुंबईत सगळं केलं. म्हातारीचा बुट ब्रिटिशांनी केला. राणीचा बाग ब्रिटिशांनी तयार केला. शिवसेनेनं मुंबईत काय केलं? असा प्रश्न भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेला केला होता. त्यांच्या या प्रश्नाला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले? अहो! शिवसेनेमुळे मुंबई महाराष्ट्रात राहिली हे लक्षातअसू द्या, असा खरमरीत टोला शिवसेनेचे संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर लगावला.

शिवसेनेने मुंबईसाठी काय केले? असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केल्यानंतर लोकमत या वृत्तपत्राशी बोलताना राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लक्ष्य केले. पाटील यांना असले सुंदर विचार सुचतातच कसे?, याचा शोध घ्यायला हवा. शिवसेनेने मुंबई महाराष्ट्रात (Maharashtra) कायम ठेवली. मुंबईला महाराष्ट्राच्या बाहेर काढण्याचा डाव शिवसेनेने हाणून पाडला. अन् मुंबईवर मराठी माणसाचा पगडा कायम ठेवला. चंद्रकांत पाटलांचे बिटिशांवरील प्रेम अधिकच दिसत आहे. ब्रिटिशांना भारतातून जाऊन बरेच वर्षे झाले आहे. शिवसेनेने मुंबईसाठी काय केले, हे जरा महाराष्ट्रातील जनतेला जाऊन एकदा तरी विचारा. वाटल्यास या विषयावर सर्वांचे मत जाणून घ्या. संयुक्त महाराष्ट्रानंतर मुंबई केंद्रशासित प्रदेश होणार वा महाराष्ट्राच्या हातून निसटणार, असे प्रसंग उभे झाले होते. पण शिवसेनेने बाणेदारपणे मुंबई महाराष्ट्रातच कायम ठेवली.

चंद्रकांत पाटलांसारखी व्यक्ती मुंबईत येऊन आज जाहीरपणे काहीही बोलू शकतात, शिवसेना (Shivsena) नसती तर तेही शक्य झाले नसते. ब्रिटिशांच्या कामांची आठवण जर करून देत असाल तर मग राजधानी दिल्लीतील संसद भवनही ब्रिटिशांच्याच काळात तयार झालेले आहे, असे सांगून राऊत म्हणाले, की मुंबईसाठी शिवसेनेनं केलेल्या योगदानाची मोठी यादी तुम्हाला देता येईल. रस्ते, पाण्यापासून स्थानिकांना रोजगार देण्यापर्यंत अनेक कामे शिवसेनेने केलेली आहेत, असेही राऊत म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मोदींमुळेच भाजपाला सात वर्षांपासून मिळते आहे यश; संजय राऊतांनी केले जाहीर कौतुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button