बाळासाहेबांचा विसर पडला म्हणून नेहरुंची पुण्याई आठवते; दरेकरांचा राऊतांना टोला

Pravin Darekar and sanjay raut

मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) आणि शिवसेनेला (Shiv Sena) दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या पुण्याचा विसर पडला आहे. सत्तेत राहण्यासाठी त्यांना सध्या फक्त काँग्रेस (Congress) आणि जवाहर लाल नेहरू यांची पुण्याई आठवत आहे, अशी विखारी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी केली आहे. केंद्रातील भाजप (BJP) सरकारने ७ वर्षे पूर्ण केल्याच्या निमित्ताने काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला लोकांनी प्रतिसादच दिला, नाही असंही दरेकर म्हणाले आहेत.

प्रवीण दरेकर यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर चर्चा केली. मोदी सरकारच्या सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसनं केलेले आंदोलन फुसका बार निघाला. पण या आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. अनेक ठिकाणी गर्दी झाली. माझ्यावर कारवनाई केली, गुन्हे नोंदवले तशी कारवाई मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर करावी अशी मागणीही दरेकरांनी केली. ७ वर्षात आम्ही काय केलं ते सांगायला तयार आहोत. पण तुम्ही ७० वर्षांत कोणती कामगिरी केली हे ते सांगायला तयार आहात का? असा प्रश्न दरेकर यांनी उपस्थित केला. कलम ३७०, महिलांना गॅस, जीएसटी, सामाजिक संतुलन रख्याण्यासाठी तीन तलाकचा निर्णय, सीएए अशा मोदी सरकारच्या कामाचा पाढा त्यांनी वाचला. कोरोना संकटाची दोन वर्ष सोडली तर सातत्यानं देशाचा जीडीपी वाढल्याचंही दरेकर म्हणाले.

लसीच्या मुद्द्यावरूनही त्यांनी मुंबई मनपा आणि राज्य सरकारला धारेवर धरले. मुंबई महापालिका आणि राज्य सरकार गोंधळलेलं आहे. लसीकरण केंद्राचे उद्घाटन केलं तिथं लस उपलब्ध नाही. पण लोक पैसे देवून लस घेत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी खाजगी पद्धतीनं लसीकरण करावं, असा यांचा प्रयत्न असल्याचं दरेकर म्हणाले.

लॉकडाऊनबाबत (Lockdown) बोलताना दरेकर म्हणाले की, मुख्यमंत्र्यांचा फक्त लोकांशी संवाद असता कामा नये. त्यांनी लोकांच्या मागणीचा आणि भावनांचा विचार करायला हवा. तुम्ही रुग्णसंख्या आणि मृत्यूचा आकडा कमी होत असल्याचं सांगत आहात. तर मग तसा दिलासाही द्यायला हवा, असं दरेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button