याद राखा, ममतादीदींना दिल्लीला यावे लागेल; खासदार प्रवेशसिंग वर्मांचा इशारा

MP Pravesh Singh Verma - Maharashtra Today

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीनंतर हिंसाचार भडकला. तृणमूल काँग्रेसकडून कार्यकर्त्यांची हत्या केली जात आहे, असा आरोप भाजपचे खासदार प्रवेशसिंग वर्मा यांनी केले आहे. पश्चिम बंगालमधील हिंसाचाराबद्दल खासदार प्रवेशसिंग वर्मा यांनी टीएमसीला धमकावले आहे. ‘याद राखा, बंगालच्या मुख्यमंत्री, टीएमसीचे खासदार आणि आमदारांना दिल्लीत यायचे आहे, हा इशाराच समजा’ अशी धमकी प्रवेशसिंग वर्मा यांनी दिली आहे.

भाजपच्या खासदाराने बंगालच्या मुख्यमंत्री आणि टीएमसीच्या खासदारांना धमकावल्याने खळबळ उडाली आहे.प्रवेशसिंग वर्मा हे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री साहिबसिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत. निवडणुकीत जयपराजय होतच असतो. पण हत्या होत नाही. बंगालच्या विजयानंतर टीएमसीचे गुंड भाजप कार्यकर्त्यांवर हल्ला करत आहेत. गुंड आमच्या कार्यकर्त्यांची हत्या करत आहेत. त्यांना मारहाण केली जात आहे. घरांना आग लावत आहेत, असे वर्मा म्हणाले.

त्याचबरोबर, बंगालचे भाजप प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनीसुद्धा या हिंसेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली होती. मतमोजणीनंतर टीएमसी प्रायोजित भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले होत आहेत, असा आरोप विजयवर्गीय यांनी केला होता. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे आज बंगालमध्ये येत आहेत. निवडणुकीनंतर बंगालमध्ये भाजपच्या चार  कार्यकर्त्यांची हत्या झाली. तसेच चार हजारांपेक्षा अधिक घरांवर हल्ले करण्यात आले, असे विजयवर्गीय यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button