आयपीएल 2021 कशासाठी लक्षात राहील?

Maharashtra Today

आयपीएल 2021(IPL 2021) वर तूर्तास पडदा पडला आहे पण यंदाच्या आयपीएलमध्ये जे 29 सामने झाले त्यात बऱ्याच गोष्टी लक्षात राहणाऱ्या घडल्या आहेत. त्यात सर्वात पटकन आठवणारी गोष्ट म्हणजे पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) डावाच्या पहिल्याच षटकात लगावलेले सहा चौकार आणि रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) एकाच षटकात वसूल केलेल्या 36 धावा. हे दोघेही असा पराक्रम करणारे आयपीएलच्या इतिहासात अनुक्रमे अजिंक्य रहाणे व ख्रिस गेलनंतरचे पहिलेच खेळाडू ठरले पण विशेष हे की, एकाच आयपीएलमध्ये डावाच्या पहिल्या आणि शेवटच्या षटकात सर्वाधिक धावा निघण्याची ही पहिलीच वेळ होती.

आयपीएलच्या इतिहासात राॕयल चॕलेंजर्स बंगलोरने (RCB) पहिल्यांदाच ओळीने पहिले चार सामने जिंकले. मुंबई इंडियन्सने (MI) पहिल्यांदाच दोनशेपेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि चेन्नईने (CSK) पहिल्यांदाच दोनशेपेक्षा अधिक धावा करून सामना गमावला. संजू सॕमसन (Sanju Samson) हा कर्णधार म्हणून पदार्पणातच शतक करणारा पहिला फलंदाज ठरला तर पंजाब किंग्जने आपल्या कर्णधारांची संख्या सर्वाधिक 13 पर्यंत वाढवली. पॕटरसन कमिन्सने आठव्या क्रमांकावरील फलंदाजाची सर्वोच्च खेळी (66) केली.सनरायझर्सने पहिल्यांदाच सुरुवातीचे ओळीने तीन सामने गमावले.

हर्षल पटेल (Harshal Patel) हा मुंबई इंडियन्सविरुध्द पाच बळी मिळवणारा पहिला गोलंदाज ठरला तर आयपीएलमध्ये अर्धशतकांचे अर्धशतक करणारा डेव्हिड वाॕर्नर हा पहिला फलंदाज ठरला. सुपर किंग्जची धोनी आणि रैना ही जोडी पुन्हा एकत्र दिसली. गेल्या वर्षी रैना खेळला नव्हता.

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) सलामी फलंदाज नितीश राणा (Nitish Rana). हा आयपीएलच्या (IPL) इतिहासात एकदम आगळीवेगळी नोंद असलेला फलंदाज ठरला आहे.

0, 81, 0, 87, 0, 80 असा त्याच्या खेळींचा भन्नाट क्रम राहिला आणि यात केवळ आलटून पालटून 0 व 80+ धावा एवढेच नाही तर याच हे जे तिन्ही शून्य आहेत त्या डावांमध्ये तो पहिल्याच चेंडूंवर बाद झाला.

कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई विरुध्द पहिले तीन गोलंदाज जे वापरले ते फिरकी गोलंदाज होते. रोहित शर्माने सात वर्षानंतर गोलंदाजी केली. निकोलस पूरनने एकही चेंडू न खेळता आणि पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवरील भोपळे चर्चेत राहिले. सीएसके विरुध्द केकेआरने आठ फलंदाज एकेरी धावात बाद होऊनही दोनशेच्यावर मजल मारली. ख्रिस गेल हा टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला तर डेव्हिड वाॕर्नरने 10 हजार धावांचा टप्पा गाठला.

यासारख्या विक्रमांनी अपूर्ण राहिलेले आयपीएल 2021 संस्मरणीय बनवले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button