गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत; राष्ट्रवादीच्या मंत्र्याने केला आरोप

Maharashtra Today

मुंबई : “देशामध्ये रेमडेसिवीर औषधाचा तुटवडा असताना सुरतमधील भाजपच्या कार्यालयात हेच औषध मोफत वाटले जात आहे, हे राजकारण नाही तर काय आहे?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी केला आहे. यासंदर्भात नवाब मलिक यांनी ट्विट केला आहे. भाजपाच्या गुजरातमधील रेमडेसिवीर मोफत वाटपाच्या मुद्द्यावर टीका (Remedesivir free in Gujarat) करत प्रश्न उपस्थित केला आहे.

“कोरोनाने देशात आणि राज्यात गंभीर स्वरूप धारण केले आहे. त्यातच केंद्र सरकारकडून राज्यात लस वाटपात राजकारण सुरू आहे. सुरतमध्ये भाजप कार्यालयात मोफत रेमडेसिवीर वाटप करण्यात येत आहे.” असे म्हणत नवाब मलिक यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, या इंजेक्शनवरून महाराष्ट्रात मोठा गदारोळ उडाला आहे. कारण एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अत्यवस्थ रुग्णांच्या उपचारात वापरण्यात येणारे रेमडेसिवीर या इंजेक्शनचा तुडवडा जाणवत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात येत आहे. मात्र, अद्याप ही स्थिती सुधारलेली नाही. रुग्णांचे नातेवाईक हे इंजेक्शन उपलब्ध करण्यासाठी धावाधाव करत आहे. अशातच नवाब मलिक यांनी भाजपवर आरोप केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button