अतिदुखापत रुग्णांना रेमडेसिवीर मोफत; योगी आदित्यनाथ यांचा निर्णय

Yogi Adityanath - Remdesivir - Maharashtra Today
Yogi Adityanath - Remdesivir - Maharashtra Today

लखनऊ :- देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवत आहे. आता याबाबत यूपीतील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या गंभीर रुग्णांना दिलासा दिला आहे. अतिदुखापत असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीर इंजेक्शन (Remdesivir) यूपी सरकार मोफत उपलब्ध करून देणार आहे. यामुळे रुग्ण लवकर बरे होतील. यापूर्वी यूपी सरकारने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचाही निर्णय घेतला आहे.

यूपीमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील ऑक्सिजनचा तुटवडा दूर केला आहे. त्यांनी कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी मोठी घोषणा केली. सरकारी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या गंभीर रुग्णांना हे रेमडेसिवीर मोफत दिले जाणार आहे, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. तर खासगी रुग्णालयांना कंपन्या आणि बाजारातून रेमडेसिवीर खरेदी करावे लागेल. एखाद्या खासगी रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध नाही आणि रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तेथील जिल्हाधिकारी आणि मुख्य आरोग्य अधिकाऱ्यांना त्या रुग्णालयात रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावे लागेल. मागणीनुसार सर्व जिल्ह्यांना पुरेशा प्रमाणात रेमडेसिवीर उपलब्ध करून देण्यात यावे. गरज पडल्यास खासगी हॉस्पिटल्सनाही ठरलेल्या किंमतीत रेमडेसिवीर उपलब्ध करून द्यावेत, असे आदेशही योगी आदित्यनाथ यांनी दिले.

ही बातमी पण वाचा : राजकारण्याने थेट कंपनीकडून ‘रेमडेसिविर’ कसे मिळविले?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button