‘रेमडेसिवीर’ जीवनरक्षक औषध नाही, टास्क फोर्सने सुचवले ‘फेव्हीपॅरावीर’; अमोल कोल्हेंचा सल्ला

Remdesivir - Amol Kolhe

मुंबई : कोरोना (Corona) काळात रेमडेसिवीर (Remdesivir) औषध रुग्णांसाठी संजीवनी मानले जात आहे. सध्या रेमडेसिवीरचा तुटवडा भासत आहे. रेमडेसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. ते उपलब्ध नसल्यास कोविड टास्क फोर्सने ‘फेव्हीपॅरावीर’ हे पर्यायी औषध सुचवले आहे, ते रुग्णाला द्यावे, अशी माहिती राष्ट्रवादीचे (NCP) खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिली आहे.

‘रेमडेसिवीरच्या वापराबाबत टास्क फोर्सने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा व्हिडीओ केल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रिया आल्या. यात एक महत्त्वाची प्रतिक्रिया अशी होती की, डॉक्टरांनी हे इंजेक्शन तर लिहून दिले, पण ते आता मिळत नाही. राज्यात अनेक ठिकाणी तुटवडा निर्माण झाला आहे. या परिस्थितीत काय करावे?’ याकडे अमोल कोल्हेंनी लक्ष वेधले आहे.

“कोविड टास्क फोर्सने सांगितले की, रेमडेसिवीर हे जीवनरक्षक औषध नाही. शरीरातील विषाणूंचा भार (व्हायरल लोड) कमी करण्यासाठी ते दिले जाते. यामुळे रुग्णाचा जीव वाचतो असे नाही. त्याचा रुग्णालयातील काळ कमी होऊ शकतो. परंतु, जर ते उपलब्ध झाले नाही, तर काहीच उपलब्ध नसेल, तर टास्क फोर्सने पर्यायी औषध ‘फेव्हीपॅरावीर’ सुचवले आहे. ते रुग्णाला तोंडावाटे द्यावे. ते महाराष्ट्रात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासन आणि प्रशासन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहे.” अशी ग्वाही कोल्हेंनी दिली.

“वाढत्या रुग्णसंख्येमुळे रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याला मर्यादा येत आहेत. हा पुरवठा सुरळीत होईपर्यंत टास्क फोर्सने सुचवलेली औषधे रुग्णांना देता येतील. ऑक्सिजन या काळात महत्त्वाचे औषध आहे. तसेच रेमडेसिवीर देताना रुग्णांची डॉक्टरांनी पुरेशी काळजी घ्यावी. सोबतच उपलब्ध साठा काळजीपूर्वक वापरून गरज असणाऱ्या रुग्णांनाच हे इंजेक्शन दिले जावे. अवाजवी वापर टाळावा, अशी माझी नम्र विनंती आहे.” असे ट्विट अमोल कोल्हे यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button