मूत्रपिंड, यकृताच्या समस्या असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी रेमडेसिवीर नाही

पुणे : ज्या रुग्णांना यकृत आणि मूत्रपिंडातील समस्या आहेत त्या कोरोना पॉझिटिव्ह  रुग्णांमध्ये अँटीव्हायरल ड्रग  रेमडेसिवीर  इंजेक्शनचा वापर करण्याबाबत तज्ज्ञांनी खबरदारी घेण्याची सूचना केली आहे.

औषध विभागाच्या तज्ज्ञांचे असे मत आहे की, एखाद्या व्यक्तीला  मूत्रपिंड, यकृताच्या समस्या असेल तर अशा रुग्णांना आधी काही तपासण्याची आवश्यकता असते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार यकृत एंझाइम व्हॅल्यूजचे मूलभूत प्रमाण सर्वसाधारण मर्यादेपेक्षा पाचपट जास्त असेल तर रेमडेसिवीर   इंजेक्शन वापरणे धोक्याचे ठरू शकते.

रुबी हॉल क्लिनिकचे हेपेटालॉजिस्ट, विनीत शाह यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यात न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या गंभीर कोविड प्रकरणांवरील डेटा – हेपॅटिक (यकृत) रुग्णांच्या शरीरात निर्माण होणारी  द्रववाढ आतापर्यंत सर्वांत सामान्य प्रतिकूल होते.  ते २३ टक्के रुग्णांमध्ये होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER