पोलिसात तक्रार : मुख्यमंत्री ठाकरे यांच्या सहीनंतर फाईलवर शेरा बदलला

FIR - CM Uddhav Thackeray

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी सही केल्यानंतर फाईलमधील शेराच बदलल्याचा धक्कादायक आणि अतिशय गंभीर प्रकार झाल्याचे समोर आले आहे. मंत्रालयामध्येच गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात फसवणूक आणि धोकाधडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.

या प्रकरणी माहिती अशी, सार्वजनिक बांधकाम विभागातील एका अधीक्षक अभियंत्याच्या खात्यांतर्गत चौकशीच्या फाईलवर सही केली होती. मात्र, याच फाईलवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहीच्या अगदी वर लाल शाईने चौकशी बंद, असा बनावट शेरा लिहिला.

या प्रकरणात अनोळखी व्यक्तीविरोधात एफआयआर नोंद करण्यात आला असून या प्रकरणाची चौकशी सुरू केली असल्याची माहिती झोन-१ चे पोलीस उपायुक्त शशीकुमार मीना यांनी दिली आहे. दरम्यान, अशी अभूतपूर्व घटना घडल्याने मंत्रालयात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली सही ही शक्तिशाली असते. घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित यंत्रणेवर असते. मुख्यमंत्र्यांनी एकदा सही केल्यानंतर कोट्यवधीचा निधी परस्पर जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या सहीशी केलेली छेडछाड अत्यंत गंभीर परिणाम करणार आहे. त्यामुळे हे प्रकरण यंत्रणेने गांभीर्याने घेतले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER