आंदोलनातील काही खटल्यातून शेट्टी आणि खोत यांना दिलासा

Sadabhau Khot - Raju Shetti

सातारा : उसदर वाढ आंदोलनामुळे राज्यभर माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) आणि माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर खटले दाखल आहेत. कराड तालुक्यातील ४७, पाटण तालुक्यातील दोन आणि वाई तालुक्यातील एक अशा सुमारे ५० खटल्यातून न्यायालयाने शेट्टी आणि खोत यांची सुटका केली. अजूनही राज्यभरातील तालुक्यात या दोघांविरोधात खटले प्रलंबित आहेत.

गेल्या पंधरा वर्षात दरवर्षी ऊस गळीत हंगाम सुरु होण्यापूर्वी उसाच्या दरावरुन शेतकरी संघटना आणि शासन, कारखानदार यांच्या संघर्षाची ठिणगी पडत होती. उसदरवाढ आंदोलनांने यादरम्यान उग्र स्वरुप धारण केले. दगडफेक, जाळपोळ, कार्यालयांना टाळे ठोकणे आदी प्रकार आंदोलक शेतकऱ्यांकडून घडले. दरम्यान, २०१२ मध्ये एसटी बसवर झालेल्या दगडफेकीत चालक जखमी झाला. तसेच दुसऱ्या आंदोलनात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता.

याआंदोलनावेळी शेट्टी आणि खोत उपस्थित नसतानाही त्यांनी जमावाला चिथावणी दिल्याचा ठपका ठेवून आरोपी करण्यात आले होते. अशा सुमारे ५० खटल्यातून या दोघांना दिलासा मिळाला. आमच्यावर राज्यभर खटले दाखल आहेत. शेतकरी हिताचे आंदोलनातून हे दाखल असल्याने त्याचा आनंद आहे. इंदापूर, बारामती, कोल्हापूर, सांगली, आदीसह राज्यभर खटले सुरु असल्याचे यानिमित्ताने शेट्टी आणि खोत यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER