राज्याला आज पुन्हा दिलासा, दिवसभरात ३१ हजार ९६४ रूग्ण कोरोनामुक्त

Corona Virus

मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३१ हजार ९६४ रूग्ण करोनातून बरे झाले असून, २० हजार २९५ नवीन करोनाबाधित आढळले आहेत. तरे ४४३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ५३,३९,८३८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ९३.४६ टक्के एवढे झाले आहे. तर, सध्या राज्यातील मृत्यूदर १.६५ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,४६,०८,९८५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५७,१३,२१५ (१६.५१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच, सध्या राज्यात २०,५३,३२९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १४,९८१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण २,७६,५७३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button