राज्याला दिलासा, रिकव्हरी रेट ९३ टक्के; तर ३४ हजार ३७० जण कोरोनामुक्त

Coronavirus Maharashtra

मुंबई : राज्यातील जनतेसाठी दिलासादायक वृत्त आहे. नव्या कोरोनाबाधितांची (Corona) संख्येत किंचित घट झाली असली, तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून गुरुवारी देण्यात आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात आज दिवसभरात ४२५ रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बुधवारी हे प्रमाण ४५३ इतकं होतं. तसेच, गेल्या आठवड्याभरात हे प्रमाण सातत्याने ५००च्या वर राहिलं आहे. त्यामुळे प्रशासनासाठी मृत्यूंची संख्या कमी होणं ही दिलासादायक बाब ठरली आहे. राज्याचा सध्याचा मृत्यूदर १.६३ टक्के इतका आहे.

राज्यात मृतांच्या कमी झालेल्या संख्येप्रमाणेच नव्या करोनाबाधितांची संख्या देखील दिलासा देणारी ठरली आहे. आज दिवसभरात राज्यात २१ हजार २७३ नव्या करोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. हे प्रमाण गेल्या काही दिवसांत ६० हजारांवरून २१ हजारांवर आलं आहे. त्यासोबतच आज दिवसभरात ३४ हजार ३७० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा ५२ लाख ७६ हजार २०३ इतका झाला आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट देखील ९३.०२ टक्के इतका वाढला आहे. राज्यात आजघडीला एकूण ३ लाख १ हजार ०४१ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण करोनाबाधितांची संख्या ५६ लाख ७२ हजार १८० इतकी झाली असून एकूण मृतांचा आकडा ९२ हजार २२५ इतका झाला आहे.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button