राज्याला दिलासा : राज्यात ५३ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त, रूग्णसंख्येतही घट

Maharashtra Coronavirus

मुंबई : मागील दोन महिन्यांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोनाबाधितांच्या (Corona) वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर राज्यात ३१ मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत गेल्या काही दिवसांपासून राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घसरण होताना दिसत आहे. गुरूवारी आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात ४२,५८२ नवे करोनाबाधित तर ५४,५३५ रूग्ण बरे होऊन परत गेले होते. तर आज सलग दुसऱ्या दिवशीही नव्या करोनाबाधितांच्या संख्येत अजून घट झाल्याचं दिसून आलं. आजच्या आकडेवारीनुसार राज्यात ३९ हजार ९२३ नवे करोनाबाधित आढळले असून ५३ हजार २४९ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. गेल्या काही दिवसांमध्य हे प्रमाण वाढल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट आता ८८.६८ टक्क्यांवर गेला आहे.

शुक्रवारच्या नव्या आकडेवारीनंतर राज्यात आत्तापर्यंत सापडलेल्या करोनाबाधितांचा आकडा ५३ लाख ९ हजार २१५ इतका झाला आहे, तर त्यातल्या ४७ लाख ७ हजार ९८० रुग्णांनी करोनावर यशस्वीपणे मात केली आहे. यापैकी सध्या राज्यात ५ लाख १९ हजार २५४ अॅक्टिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत.

दरम्यान, राज्याचा रिकव्हरी रेट दिलासा देणारा ठरत असला तरी, राज्यात करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा आकडा मात्र अजूनही खूप मोठा आहे. शुक्रवारी दिवसभरात राज्यात ६९५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आत्तापर्यंत राज्यात एकूण मृतांचा आकडा ७९ हजार ५५२ इतका झाला आहे. एकूण मृत्यूदर १.५ टक्के इतका जरी नोंदवला गेला असला, तरी एकूण रुग्णांचा आकडा सातत्याने वाढत असल्यामुळे हा मृत्यूदर कमी दिसत आहे. प्रत्यक्षात मात्र मृतांचा आकडा जास्तच राहिला असल्याचं गेल्या महिन्याभरातल्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button