राज्याला दिलासा : राज्यात ५१ हजारांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त; रुग्णसंख्येतही घट

Maharashtra Coronavirus

मुंबई : राज्यात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णसंख्येत काहीशी घट झाली आहे. राज्यात आज ३४ हजार ३१ कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर ५१ हजार ४५७ रुग्ण कोरोनामुक्त (Corona) होऊन घरी परतले आहेत. तर ५९४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात ४ लाख १ हजार ६९५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ८४ हजार ३७१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत एकूण ४९,७८,९३७ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०६ टक्के एवढा झाला आहे. दरम्यान, सध्या राज्यातील मत्युदर १.५४ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ३,१८,७४,३६४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ५४,६७,५३७ (१७.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३०,५९,०९५ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २३ हजार ८२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button