राज्याला दिलासा, 24 तासात महाराष्ट्रातील 48,74,582 रुग्ण कोरोनामुक्त

Corona Virus

मुंबई : एकीकडे राज्यातील समुद्र किनारपट्टी भागात चक्रीवादळाने मोठ्याप्रमाणात नुकसान केले असताना आज राज्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर मृत्यूच्या संख्येतही मोठी घट पाहायला मिळत आहे. आज 48,211 रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यात आजपर्यंत एकूण 48,74,582 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.19% एवढे झाले आहे.

आज राज्यात 26,616 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या 24 तासात 516 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.53% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,13,38,407 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 54,05,068 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 33,74,258 व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर 28,102 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 4,45,495 सक्रिय रुग्ण आहेत.

Disclaimer:-बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button