‘म्युकरमायकोसिस’ रुग्णांना दिलासा; राजेश टोपेंची घोषणा

Rajesh Tope - Mucormycosis

मुंबई : आधीच जगभरात कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. राज्यात आता कोरोनासह म्युकरमायकोसिसचे (Mucormycosis) नवे संकट निर्माण झाले आहे. ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर होणारा सर्व खर्च ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’तून करण्यात येणार आहे. ही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे.

राज्यात सध्या म्युकरमायकोसिसचे १ हजार ५०० रुग्ण आहेत. तर ५०० रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत, याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’त १.५ लाख रुपयांपर्यंतची वैद्यकीय मदत केली जात होती. मात्र, या दरम्यान ‘म्युकरमायकोसिस’मध्ये रुग्णांच्या उपचारासाठी मोठ्या प्रमाणात खर्च लागत आहे. या योजनेत काहीसा बदल करून ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवरील उपचारासाठी लागणारा सर्व खर्च या योजनेतून केला जाणार आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. या रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाइकांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यात सध्या असलेल्या ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांची संख्या पाहता दोन लाख ‘एम्फोटेरेसीन बी’ इंजेक्शन्सची गरज आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

रेशन कार्डधारकांना लाभ
म्युकरमायकोसिस झालेल्या रुग्णाच्या कुटुंबाकडे कोणत्याही रंगाचे रेशन कार्ड असेल त्या सर्वांना ‘महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने’तून मदत दिली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button