इंदुरीकर महाराजांना ‘त्या’ वक्तव्याप्रकरणी न्यायालयाकडून तूर्तास दिलासा

Indurikar Maharaj

मुंबई : प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर (Indurikar Maharaj) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हाही दाखल झाला असून, न्यायालयात सध्या सुनावणी सुरू आहे. आज संगमनेर न्यायालयाकडून (Sangamner Court) इंदुरीकर महाराज यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

न्यायालयात हजर राहण्याच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर वैद्यकीय अधिकारी भास्कर भवर यांच्या फिर्यादीवर संगमनेर कोर्टात (PCPNDT) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर या प्रकरणाची न्यायालयात सुनावणी सुरू असून, ३ जुलै रोजी न्यायालयानं त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. दरम्यान ‘अमुक दिवशी स्त्रीसंग केला तर मुलगा होतो किंवा मुलगी होते’ असं वक्तव्य असलेला इंदुरीकर महाराज यांचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

काही सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीने इंदुरीकर महाराजांवर गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली होती. मात्र, त्यांनी हे वक्तव्य कुठे आणी कधी केले याबाबत कुठलाही पुरावा नसल्याचं कारण देत मार्च महिन्यात अहमदनगर जिल्हा प्रशासनाने गुन्हा दाखल केला नव्हता.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या रंजना गवांदे यांनी याबाबत मात्र पाठपुरावा करून संबंधित प्रकरणाचे पुरावे जिल्हा आरोग्य विभागाला दिल्यानंतर २६ जून रोजी संगमनेर कोर्टात जिल्हा आरोग्य प्रशासनाने इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER