पवारांचा धनंजय मुंडेंना दिलासा, तुर्तास राजीनामा न घेण्याचा निर्णय

Dhananjay Munde-sharad pawar

मुंबई :- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्मा यांनी केलेल्या बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या अडचणी वाढल्या आहेत. मागील काही तासांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) धनंजय मुंडे यांच्या पाठिशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी धनंजय मुंडे यांना दिलासा देत तूर्तास त्यांचा राजीनामा न घेण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या निर्णयामुळे धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाल्याचे मानले जात आहे.

रेणू शर्मा (Renu Sharma) या महिलेने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले होते. शर्मा यांनी पोलिसांकडे जाऊन रीतसर तक्रारही नोंदवली होती. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्या होत्या. मात्र, गुरुवारी दुपारच्या सुमारास भाजप नेते कृष्णा हेगडे यांच्या खळबळजनक गौप्यस्फोटानंतर हे चित्र पूर्णपणे पालटले होते. रेणू शर्मा हीच ब्लॅकमेलिंग करत असल्याची बाब समोर आली. पक्षप्रमुख शरद पवार यांनी याबाबत माहिती घेतली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. त्यामुळे तूर्तास तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही, असा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकीत घेण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मुंबईतील निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील हे बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसने पोलिसांच्या पुढील तपासापर्यंत थांबायचा निर्णय घेतला आहे. परिणामी तूर्तास धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागणार नाही. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावरील राजकीय गंडांतर टळल्याचे मानले जात आहे.

या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), मुख्य प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Nawab Malik), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope), गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh), गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) उपस्थित होते. या बैठकीत धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांबाबत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी पक्षाची भूमिका मांडली आणि पक्ष पूर्णपणे धनंजय मुंडे यांच्या पाठीशी उभा असल्याचं दिसून आलं.

ही बातमी पण वाचा : मुंडेंचे मंत्रिपद धोक्यात, शरद पवार – उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे राज्याचे लक्ष, चित्रकुटवर जमले समर्थक आणि अधिकारी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER