रिझर्व बँकेकडून भारतीयांना दिलासा

Shaktikanta Das

नवी दिल्ली :- करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज केली. तसेच नागरिकांनी संयम बाळगावा, असे आवाहन ही त्यांनी केले. रिझर्व् बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमी रिझर्व्ह बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत मोठी घोषणा केली.

शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे. तसेच रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणा शक्तिकांता दास यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझव्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.

ही बातमी पण वाचा : भारतात ‘या’ राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय

बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.तीन महिने ईएमआय स्थगित करा कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


Web Title : Relief from RBI to Indians

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)