राज्यासाठी दिलासा: गेल्या २४ तासात २९ हजार २७० रुग्ण बरे होऊन घरी परतले

Coronavirus

मुंबई : एकीकडे नवे करोनाबाधित आणि मृतांचे आकडे खाली येत असताना दुसरीकडे राज्यातील बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे आकडे वाढू लागले आहेत. गेल्या २४ तासांमध्ये राज्यात २८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. एका रुग्णाचाही मृत्यू होणं ही दुर्दैवी बाब असली, तरी आठवड्याभरापूर्वीपर्यंत असलेली रोजची ६००, ७०० किंवा काही दिवशी ८०० ते ९०० मृतांची आकडेवारी २८५ पर्यंत खाली येणं ही देखील काहीशी दिलासादायक बाब ठरली आहे.

आज दिवसभरात २८५ रुग्णांचा करोनामुळे दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. त्यामुळे आजपर्यंत करोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा ९६ हजार ७५१ इतका झाला आहे. मात्र, त्याचवेळी राज्याचा मृत्यूदर १.६७ टक्के इतका झाला आहे. एकीकडे मृतांचा आकडा खाली आल्यामुळे दिलासा मिळालेला असताना दुसरीकडे नव्या करोनाबाधितांची संख्या देखील काहीशी स्थिर झाली आहे. आज दिवसभरात राज्यात १५ हजार १६९ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत राज्यात ५७ लाख ७६ हजार १८४ नागरिकांना करोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी आजघडीला २ लाख १६ हजार ०१६ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण राज्यात उपचार घेत आहेत.

Disclaimer : बातमीत एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. महाराष्ट्र टुडेच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व महाराष्ट्र टुडे स्वीकारत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button